शिक्षक मतदार संघासाठी मतदार याद्यांची प्रक्रिया सुरु

नागपूर :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या नव्याने (de-novo) तयार करण्यात येत असून विभागातून एकूण 32 हजार 696 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अद्याप अर्ज न देऊ शकलेले पात्र शिक्षक 9 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करू शकतात, असे प्रशासनाने कळवले आहे.

नागपूर विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्हयांचा समावेश आहे. या कार्यक्रमानुसार, 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत नमुना-19 चे अर्ज स्विकारण्यात आले होते. 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत नागपूर विभागात नागपूर-11,003, वर्धा-4,200, भंडारा-3,534, गोंदिया-3,795, चंद्रपूर-7,194 व गडचिरोली-2,970 असे एकूण 32 हजार 696 अर्ज प्राप्त झालेले आहेत.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तसेच 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे. ज्या पात्र शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज केला नसेल, त्यांनी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत मतदार नोंदणीसाठी नमुना-19 मध्ये संबंधित क्षेत्रासाठी नेमून दिलेल्या पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावे असे उपायुक्त (सामान्य) यांनी कळविले आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभागात मराठी रंगभूमी दिन साजरा

Tue Nov 15 , 2022
अमरावती :- 5 नोव्हेंबर हा मराठी रंगभूमीदिन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभागात नुकताच साजरा करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्र – कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव, डॉ. तुषार देशमुख यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात.   रंगभूमी दिनानिमित्ताने विभागाचे समन्वयक रमेश जाधव यांनी प्रथम व तृतीय सत्राच्या विद्याथ्र्यांना नृत्य, नाटय शास्त्राचे महत्व आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!