विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभागात मराठी रंगभूमी दिन साजरा

अमरावती :- 5 नोव्हेंबर हा मराठी रंगभूमीदिन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभागात नुकताच साजरा करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्र – कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव, डॉ. तुषार देशमुख यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात.   रंगभूमी दिनानिमित्ताने विभागाचे समन्वयक रमेश जाधव यांनी प्रथम व तृतीय सत्राच्या विद्याथ्र्यांना नृत्य, नाटय शास्त्राचे महत्व आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधी याबाबत माहिती देऊन विद्याथ्र्यांनी या क्षेत्राकडे वळावे व अभिनयाद्वारे आपले अभिनयकौशल्य दाखवावे असे आवाहन केले. नाटयशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अनंत देव, प्रा. डॉ. मनोज उज्जैनकर, नृत्यशास्त्राचे डॉ. मोहन बोडे यांनीही विद्याथ्र्यांना मराठी रंगभूमी दिनानिमित्त कौमुदी महोत्सव, विश्व स्वप्न एकांकिचे सादरीकरण, संहिता वाचन याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. मोहन बोडे यांनी नटराज मुद्रानृत्य, वैभवी बोडे हिने दुर्गास्त्रोत्र नृत्य, तर निलेश ददगाळ याने नाटयस्वागत सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय शेंडे, सूत्रसंचालन सुवर्णा गाडगे यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. मनोज उजैनकर यांनी केले. केले. कार्यक्रमाला नाटय व नृत्यशास्त्र विभागातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

24 वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्ट मिट क्रीडा महोत्सव -2022 बास्केटबॉल स्पर्धेकरीता महिला व पुरुष संघ घोषित

Tue Nov 15 , 2022
अमरावती :-   डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे 3 ते 07 डिसेंबर दरम्यान होणा-या 24 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्टस् मिट क्रीडा महोत्सव -2022 बास्केटबॉल स्पर्धेकरीता महिला व पुरुष संघ घोषित झाला असून या दोन्ही खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दिनांक 20 ते 29 नोव्हेंबर 2022 दरम्यान होणार आहे. पुरुष संघ (बास्केटबॉल) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights