‘डिझाईन अँड बिल्ड’ स्पर्धेचे पारितोषिक वितरीत

– युवकांचा सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे विकासाकडे टाकलेले पहिले पाऊल: आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांचे युवकांना मार्गदर्शन   

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि नागपूर @२०२५ च्या वतीने घेण्यात येत असलेल्या डिझाईन अँड बिल्ड स्पर्धेचे पारितोषिक वितरण मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते सोमवारी (8 मे) रोजी करण्यात आले. ‘युवकांनी शहराप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे त्यांनी शहराच्या विकासाकडे टाकलेले पहिले पाऊल आहे’ असे मार्गदर्शन आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी युवकांना केले. यावेळी स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट १५ स्पर्धक गटांना आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या प्रथम ५ विजेत्यांना प्रत्येकी ७० हजार रुपये आणि इतर १० विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

नागपूर महानगरपालिकेच्या महाल स्थित राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे आयोजित पारितोषिक कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे मुख्य अभियंता राजू गायकवाड, नागपूर @२०२५ चे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्हार देशपांडे, समन्वयक निमिष सुतारीया, शिवकुमार राव, भावेश टहलरामानी, मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त किरण बगडे, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, नागपूर @२०२५ मुकुल कोगजे, सोनल पारेख, दिगंत शाह, प्रवीण सिंग यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्पर्धेत सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.

नागपूर शहरातील तलावांच्या काठांवर सौंदर्यीकरण करून येथे प्रेक्षणिक स्थळांची निर्मिती करणे, बाजारांची योग्य रचना करून येथेही सौंदर्यीकरण करणे, अतिव्यस्त बाजार भागात प्रसाधनगृहांची निर्मिती, बसण्याची व्यवस्था, वस्त्यांमधील मोकळ्या जागांचे सौंदर्यीकरण करून चिमुकल्या पासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हक्काचे उद्यान निमर्ण करणे, उड्डाण पूलाखालील जागेचा योग्य उपयोग करून येथे रमणीय स्थळांची निर्मिती करणे, स्मार्ट वाहतूक सिग्नल तयार करून चौकांचा कायापालट करणे अशा एक ना अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना नागपूर शहराप्रति येथील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. या संकल्पनांचे कौतुक करीत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी मनपा व नागपूर @२०२५ च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘डिझाईन अँड बिल्ड’ स्पर्धेतील सहभागींना पुरस्कार प्रदान केले.

यावेळी मार्गदर्शन करतांना आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. म्हणाले की, शहराचा सर्वागीण विकास हा लोकसहभागाने शक्य आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमधून हा सर्वसामान्य नागरिक थेट विकास कार्याशी जोडले जाते. युवकांचा सहभाग असल्यास प्रशासनालाही कार्यकरण्याचे प्रोत्साहन मिळते. त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेमुळे विकासकार्यात गती मिळते. जी २० परिषदेवेळी हे आपण सर्वानी अनुभवलेलं आहे. त्यामुळे युवकांनी अधिकाधिक प्रमाणात पुढे यावे असे आवाहन देखील आयुक्तांनी केले. नागपूर@ 2025 तर्फे चांगली संकल्पना मांडण्यात आली असून यावर मनपा सुध्दा उत्तम प्रतिसाद देत आहे. विद्यार्थ्यांतर्फे मांडलेली संकल्पनेवर निश्चित स्वरूपात अमल केले जाईल, असेही आयुक्त म्हणाले.

अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी देखील स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागरिकांचा मिळत असलेल्या सहभागाचे महत्त्व विषद केले. तसेच वॉल पेंटिंग स्पर्धा आणि ‘डिझाईन अँड बिल्ड’ स्पर्धेत सहभागाची झालेल्या स्पर्धकांचे कौतुक करीत अभिनंदन केले. कार्यक्रमात प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीजचे प्राचार्य निशांत मानापुरे, मनपाचे नगररचनाकार रुतुराज जाधव यांचे सत्कार करण्यात आला. ‘डिझाईन अँड बिल्ड’ स्पर्धेचे परीक्षण वाहतूक पोलिसच्या एसीपी तृप्ती जाधव, मनपाचे नगररचनाकार  रुतुराज जाधव, मनपाच्या पीडब्ल्यूडीचे उपअभियंता राजीव गौतम, स्टुडिओ अनाहतचे संचालक ए.आर.अमित पिंपळे, ATR Design Studio च्या तेजल रक्षमवार ललित विकंशी,क्षितिज शिरखेडकर यांनी केले.

सर्वोत्कृष्ट १५ विजेते

१) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीजचे – आकांक्षा काळे, चैतन्य मुगलीवार, देवांग चव्हान, अनिशा संगमनेरकर

२) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीजचे – रेणुका गुप्ता, वृषाली जानवे, साक्षी चौधरी, केतकी राजंदेकर, भावी चंद्राकर

३) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज – विशाल सोनी, आयुषी जैन, अंकिता परयानी, निखिल साहू, मोहित अंदानी

४) श्रीमती मनोरामाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर – सौम्या पांडे, आचल अडकिने, रचना शेरेकर, वलय भावसार

५) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज – इब्राहिम फिरोज हुसैन, हर्ष लक्ष्मण गोस्वामी, विनम्रकुमार गुप्ता, केतकी अशोक होळे

६) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीज- ध्रुव ठक्कर, चार्वी साहू, अनुश्री दोनोडे, चेतन्या लांगडे

७) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज – वैष्णवी बंग, दिशा तालडा, तुलिका धांडोळे, मोहिक धकाते, अवंती जीवतोडे

८) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज- अक्षा पौनीकर, मधुश्री घिये, नकीया नजमी

९) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज – साहिल बोंदाडे, खुशबू जैन, प्रांजल धाकुलकर

१०) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीज- अंजली सोनटक्के, भक्ती प्रतापवार, शर्वरी गोन्नाडे, रिदम गोबरे, सत्यजित हेडाऊ

११) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज – सेजल यादव, लक्ष्मी महाकाळकर, आयुष बावणे, प्रतीक गाडगे

१२) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीज – फिरदौस तबस्सूम शेख, हिमांशू हरिदास, गार्गी प्रवीण शिंदे

१३) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीज – चिन्मय नरेश जावरकर, रोहित असाटी, पूनम घोंगे, अर्चित धुमाळ

१४) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीज- अमिता सिल्ही, आदित्य बजाज, दीक्षिता कोचर, अनघा खुणे, शीतल डेकाटे

१५) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज – प्रथम गेमनानी, पलाश चौहान, ईश्वर डहाके, ओम सरोदे, गौरव परवानी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ओबीसी जनगणनेला घेऊन विदर्भात दोन टप्प्यात निघणार मंडल यात्रा

Tue May 9 , 2023
नागपूर :- ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी समाजासह सर्वांचीच जातनिहाय जनगणना भारत सरकारने करुन संविधानिक हक्क अधिकार व वाटा देण्याच्या मागणीला घेऊन यावर्षीही मंडल यात्रा दोन टप्यात काढण्यात येणार आहे.या मंडल यात्रेदरम्यान विद्यार्थ्यांना ‘मंडल आयोगाबाबत जागृती करीत त्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क समजावून सांगण्यात येणार आहे.पहिल्या टप्यात विदर्भातील सात जिल्ह्यात मंडल आयोग जनजागृती यात्रा काढण्याचा निर्णय येथील एमटीडीसीच्या सभागृहात रविवार(दि.07)ओबीसी संघटनाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!