संदीप बलविर,तालुका प्रतिनिधी
आजचे युग कलियुग नसून कलमयुग आहे-पुष्पांजली भगत
टाकळघाट येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती
महाप्रज्ञा बुद्ध विहार,पंचशील बुद्ध विहार व अशोका बुद्ध विहाराचा संयुक्त उपक्रम
नागपूर/०८ जाणे :- सध्याघडीला देशातील राजकारणी आपल्या सोयीचे राजकारण करीत असून त्यांना हवा तसा इतिहास हा समाजात पेरत आहे.उर्फी जावेद,कपडे, खानपान यासारख्या बाबीवर देशातील जनतेचे जनतेचे लक्षकेंद्रित करून देशातील खऱ्या समस्येपासून जनतेचे ध्यान भटकावे यासाठी त्यांचा सदैव प्रयत्न असतो. त्याकरिताच ते या देशातील ओ बी सी समाजाला देव, धर्म व कर्मकांडासारख्या अफीमच्या गोळ्या देऊन त्यांना निद्राधीन करण्याचे काम करीत आहे.कारण ओ बी सी शिकला तर तो या देशाची सत्ता हस्तगत करेल.म्हणून या देशातील ओ बी सी यांनी शिक्षणापासून दूर राहावे याकरिताच शिक्षणाचे खाजगीकरण हे एक मोठे षडयंत्र या देशातील मनुवादी सरकार रचत असल्याचे प्रतिपादन आंबेडकरी व्याख्याता पुष्पांजली भगत यांनी टाकळघाट येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केले. टाकळघाट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात स्त्री शिक्षणाची प्रणेता,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जन्मोत्सवा चे आयोजन नुकतेच केले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्रतिभा भगत,तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रा प सरपंच शारदा शिंगारे,माजी सरपंच अर्चना अवचट व आंबेडकरी व्याख्याता पुष्पांजली भगत या होत्या.यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाच्या पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महामानवाच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.यावेळी संबोधी महिला बचत गट च्या महिलांनी पाहुण्यांच्या स्वागतात स्वागत गीत सादर केले.त्यानंतर लहान लहान चिमुकल्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा करून त्यांचे विचार प्रकट केले.तर आंचल पाटील ने राजमाता जिजाऊ तर आरती रामटेके यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्यावर एकपात्री नाटक सादर केले.सावित्रीबाई ने शेण मातीचा मारा खाऊन स्त्रियांना शिकविले तर माँ जिजाऊ ने या देशाला दोन छत्रपती दिले.तेव्हा मुलांचे भविष्य घडविण्यासाठी या देशातील स्त्रियांनी आंदोलन उभे करणे गरजेचे असून हे कलियुग नसून कलमयुग असल्याचे विचार सुद्धा भगत यांनी बोलून दाखविले. या कार्यक्रमाचे संयुक्त संचालन काजल कांबळे व किरण मस्के यांनी,प्रास्ताविक सुनंदा गोडघाटे यांनी तर आभार प्रिया जिवने यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता पंचशील,संबोधी,संविधान,भिमाई, नारीशक्ती महिला बचत गट व महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.