संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19 :- कामठी तालुक्यातील लोणखैरी ग्रा प च्या प्रभाग क्र 1 च्या ग्र यानुसार लोणखैरी प्रभाग क्र 1 नामाप्र (महिला)प्रवर्गातील रिक्त जागा व कवठा ग्रा प च्या प्रभाग क्र 1 चे नामाप्र प्रवर्गातील रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 18 मे ला पोटनिवडणूक होणार आहे.
.लोंणखैरी ग्रा प चा पंचवार्षिक कार्यकाळ हा 10 फेब्रुवारी 2026 ला संपणार असून या प्रभागातील ग्रा प सदस्य उषाबाई नत्थुजी अंजनकर ह्या 1 डिसेंबर 2022 ला अकस्मात मरण पावल्याने त्यांच्या रिक्त ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे तसेच कवठा ग्रा प पंचवार्षिक कार्यकाळ हा 29 डिसेंबर 2023ला संपणार असून कवठा ग्रा प चे प्रभाग क्र 1 चे नामाप्र प्रवर्गातील ग्रा प सदस्य व उपसरपंच शरद माकडे हे कलम 14 (1)(ग)अनव्ये अपात्र झाल्याने त्यांच्या रिक्त ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे.
जाहीर निवडणूक कार्यक्रमा नुसार 25 मे एप्रिल ते 2 मे पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करता येईल.3 मे ला नामनिर्देशन पत्र छाननी करण्यात येईल तर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 8 मे आहे.8 मे ला दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक चिन्ह नेमून देत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.तर 18 मे ला निवडणूक तर 19 मे ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार अक्षय पोयाम यांनी दिली आहे.