पोस्टे सावनेर अंतर्गत खाजगी शिकवणी वर्ग संस्थापक, शिक्षक यांची बैठक संपन्न

सावनेर :-पोलीस स्टेशन सावनेर येथे दिनांक ३०/०७/२०२४ रोजी १८.३० ते १९.३० वाजता पर्यंत  अनिल महस्के सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांचे अध्यक्षतेखाली व रवींद्र मानकर पोलीस निरीक्षक सावनेर यांचे उपस्थितीमध्ये खाजगी शिकवणी वर्ग संस्थापक, शिक्षक यांची बैठक घेण्यात आली.बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या. क्लासरूम मध्ये व पार्किंग मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे. खाजगी सुरक्षा रक्षकची नेमणूक करावी सुरक्षारक्षकाचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षा संबंधात काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी शब्दश्री ट्युशन क्लासेस सावनेरचे संस्थापक शब्दप्रकाश ब्रम्हणपुरे, वर्चु ट्युटोरीयल क्लास सावनेर येथील श्रीमती मनिषा वाट, उत्कर्ष करिअर अॅकेडमी सावनेरचे संस्थापक दशरथ बोबडे, गुरूकुल अॅकेडमीचे संस्थापक  आकाश टोरीया, संकल्प ट्युशन क्लासेसचे दिनेश भिसे, कपिल ट्युशन क्लासेसचे कपिल राजू आडे, श्री गजानन करियर अॅकेडमीचे प्रदीप बनफर, इन्सपायर क्लासेसचे हरीष चरपे, जित सुपर लर्नर अॅकेडमीचे अजय चौधरी, केपरएस वर्ल्ड ट्युशन क्लासेसचे सुवर्णा वारई, शिवमुद्रा कोनींग क्लासेसचे योगेश लाड, विस्डम ट्युटोरीयलचे कुलदिप हिराले तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैधरीत्या देशी दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध कारवाई

Fri Aug 2 , 2024
नागपूर :- पोस्टे खापरखेडा येथील स्टाफ पोस्टे ह‌द्दीत पेट्रोलीग करीत असता मुखबिरद्वारे माहिती मिळाली की, सर्व्हिस रोडने पिपळा डाग बंगला येथे होंडा अॅक्टीव्हा गाडी क्र. MH-49/CC-0751 ने दारूची अवैध वाहतुक होत आहे. अशा माहिती वरून आरोपी नामे- राहुल कवडू वरठी वय २८ वर्ष रा. हनुमान मंदीर जवळ वार्ड नं. ४ ता. सावनेर हा त्याची होंडा अॅक्टीव्हा गाडी क्र. MH-49/CC-0751 ने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com