प्रिन्स बिअर बार च्या चोरी प्रकरणातील चोरट्यास अटक करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 25:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा रोडवरील प्रिन्स बिअर बार मध्ये अवैधरित्या शिरून नगदी 32 हजार 500 रुपयांची चोरी झाल्याची घटना 20 मार्च ला सकाळी साडे दहा दरम्यान घडली असता यासंदर्भात फिर्यादी सुनिल पाटील रा. मोदी पडाव कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदवित तपासाला गती दिली असता सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करीत व तर्कशक्तीचा वापर करून आरोपीचा छडा लावण्यात नवीन कामठी पोलिसांनी यश गाठत बिअर बार नजीकच्या भारत पेट्रोलपंप च्या पार्किंग मध्ये उभे असलेल्या 12 चाकी ट्रक क्र एम एच 40 सी डी 4826 मधून अटक करण्यात आले.अटक आरोपीचे नाव सुखदेव उर्फ सुक्का जाधव वय 32 वर्षे रा गोंदेगाव म्हाळेगाव तांडा,जिल्हा जालना असे आहे.या अटक आरोपी कडून नगदी 27 हजार 500 रुपये,एक लोखंडी रॉड किमती 200 रुपये असा एकूण 28 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही यशस्वी कार्यवाही डीसीपी मनीष कलवानिया,एसीपी नयन अलूरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलिस उपनिरीक्षक श्याम वारंगे,गुन्हे प्रकटीकरण विभागाचे संतोषसिंग ठाकूर,अनिल बाळराजे,निलेश यादव,अनुप अढाऊ, ललित शेंडे,हर्षद वासनिक यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बांधकाम आणि पाडाव कचऱ्यावर भांडेवाडी येथे होणार पुनर्वापर प्रक्रिया

Fri Mar 25 , 2022
आयुक्तांनी केली करारनाम्यावर स्वाक्षरी नागपूर : नागपूर शहरात दररोज निर्माण होणारा बांधकाम आणि पाडाव (Construction and Demolition) कचरा कमी होणार असून शहर आणखी स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होणार आहे. रामकी एन्व्हायरो इंजिनियर लिमिटेड अंतर्गत कार्यरत हैद्राबाद सी अँड डी वेस्ट प्रा. कंपनीतर्फे नागपूर महानगरपालिका हद्दीतील बांधकाम व पाडाव वेस्टवर पुनर्वापर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासंबंधी नागपूर महानगरपालिका आणि रामकी हैद्राबाद सी अँड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com