संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची वाणी ऐकायला मिळणं, ही एक पर्वणीच ! ‘मन की बात’च्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी हा पूर्ण देश जोडून ठेवल्याचे भाजपा नागपुर जिल्हा कार्यकारिणी सदस्य उज्वल रायबोले यांनी म्हटले आहे. देशाचे यशस्वी, सक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी “मन की बात” या कार्यक्रमातून देशातील नागरिकांना संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी थेट संवाद “मन की बात” भाग ११० वा भाग ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून थेट प्रसारण दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता झाला. प्रत्येक देशवासियांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम होता. त्यावेळी मोलाचे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नवी कामठी येथील प्रभाग क्रमांक 15, बुथ नंबर- 79 येथे मन की बात कार्यक्रम संयोजक श्यामराव मैंद यांचा निवासस्थानी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र ‘मन की बात’ कार्यक्रम पाहिला. सुपर वारियर उज्वल रायबोले सोबत मोदीचे विचार अनुभवले. यावेळी शक्तिकेंद्र प्रमुख विक्की बोंबले, बूथ प्रमुख रोहित दहाट आणि धनराज दुर्गे, प्रदीप राऊत,सुनिता कटकवार,कौशल्या गायकवाड़, शशिकला मैंद, वंदना घुले, किशोर शर्मा, निकिता वाघमारे, सचिन टोंगसे, भूमेश्वरी चव्हान आदि उपस्थित होते. मन की बात हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे या देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळते, त्यासोबतच देशासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या प्रत्येक सर्व सामान्य व्यक्तीचाही मोदीजींकडून गौरव केला जातो असे भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले.