देशवासियांना जोडून ठेवणारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ११० वा ‘मन की बात’ – उज्वल रायबोले यांचे प्रतिपादन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी :- प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची वाणी ऐकायला मिळणं, ही एक पर्वणीच ! ‘मन की बात’च्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी हा पूर्ण देश जोडून ठेवल्याचे भाजपा नागपुर जिल्हा कार्यकारिणी सदस्य उज्वल रायबोले यांनी म्हटले आहे. देशाचे यशस्वी, सक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी “मन की बात” या कार्यक्रमातून देशातील नागरिकांना संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी थेट संवाद “मन की बात” भाग ११० वा भाग ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून थेट प्रसारण दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता झाला. प्रत्येक देशवासियांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम होता. त्यावेळी मोलाचे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नवी कामठी येथील प्रभाग क्रमांक 15, बुथ नंबर- 79 येथे मन की बात कार्यक्रम संयोजक श्यामराव मैंद यांचा निवासस्थानी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र ‘मन की बात’ कार्यक्रम पाहिला. सुपर वारियर उज्वल रायबोले सोबत मोदीचे विचार अनुभवले. यावेळी शक्तिकेंद्र प्रमुख विक्की बोंबले, बूथ प्रमुख रोहित दहाट आणि धनराज दुर्गे, प्रदीप राऊत,सुनिता कटकवार,कौशल्या गायकवाड़, शशिकला मैंद, वंदना घुले, किशोर शर्मा, निकिता वाघमारे, सचिन टोंगसे, भूमेश्वरी चव्हान आदि उपस्थित होते. मन की बात हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे या देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळते, त्यासोबतच देशासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या प्रत्येक सर्व सामान्य व्यक्तीचाही मोदीजींकडून गौरव केला जातो असे भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिव्यांगांचे जीवन सुसह्य करण्यासाठी कटिबद्ध - केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी

Sun Feb 25 , 2024
– सौरऊर्जाचलित मोटराईज्ड ट्रायसिकलचे वितरण नागपूर :- यापूर्वी आम्ही दिव्यांगांना ४० कोटी रुपयांचे साहित्य दिले होते. आज खासदार निधीतून ३५ दिव्यांगांना आम्ही सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटराईज्ड ट्रायसिकल दिल्या. नागपूर शहरातील प्रत्येक दिव्यांगाचे जीवन सुसह्य करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्यादृष्टीनेच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com