युवा चेतना मंच तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची (तिथीनुसार )जयंती साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- युवा चेतना मंच व कामठी निधी अर्बन बैंक यांच्या सयुक्त विद्ममाने कामठी निधी अर्बन बैंक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. . याप्रंसगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . याप्रसंगी कामठी निधी अर्बन बैंक चे चेअरमन नितीन ठाकरे डायरेक्टर नरेश सोरते , दिव्याग फाऊंडेशन चे सचिव बाँबी महेंद्र , समाज सेवक अशोक ठाकरे , प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी अक्षय खोपे यांनी सुत्रसंचालन प्रस्तावणा प्रा.पराग सपाटे आभार प्रदर्शन शेषराव अढाऊ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता अमोल नागपुरे , साजीया शेख , भाग्यश्री पटले , राजेश कवासे , अभिलास बंड युवा चेतना मंच संदस्यानी सहकार्य केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com