नवी दिल्ली :- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतीपदी फेरनिवड झाल्याबद्दल सिरिल रामफोसा यांचे अभिनंदन केले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष रामफोसा यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यम एक्सवर एका पोस्टमध्ये सांगितले;
“दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतीपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल, महामहीम @CyrilRamaphosa यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आपल्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.”