मराठा-कुणबी जातीचे पुरावे सादर करा

Ø समितीचे अध्यक्ष न्या.संदीप शिंदे नागपुरात घेणार आढावा

नागपूर :- राज्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्या. संदीप शिंदे व समितीचे इतर सदस्य दिनांक 23 नोव्हेंबर रोजी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते येथे विभागातील सहा जिल्ह्यात झालेल्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.

विभागातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तऐवज आदी जूनी अभिलेखे समितीस सादर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षामध्ये 21 ते 24 नोव्हेंबर पर्यंत स्वत:हून उपलब्ध करुन देण्याचे आवाहन विभागीय आयुक्त्‍ विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एका शेतकऱ्याचे निवेदन! कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची तत्परता अन् संपूर्ण देशात लागू झाली योजना!

Wed Nov 22 , 2023
– प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून फळ पिकांना स्वयंचलित ठिबक प्रणालीसाठी मिळणार प्रति हेक्टरी 40 हजार रुपयांचे अनुदान मुंबई :- अकोला येथील शिवार फेरीच्या दौऱ्यात एका शेतकऱ्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान देण्याबाबत निवेदन दिले, मंत्री  मुंडेंनी कृषी विभागामार्फत याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला आणि मंत्री मुंडे यांच्या या तत्परतेने संपूर्ण देशात फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com