‘जाणता राजा’ महानाट्याच्या तयारीला वेग

– नागपुरात १३, १४ व १५ जानेवारीला तीन दिवस प्रयोग

– यशवंत स्टेडियमवर होणार महानाट्य

नागपूर :- नागपुरात प्रशासनामार्फत १३, १४ व १५ जानेवारीला जाणता राजा महानाटयाचा प्रयोग होणार आहे. या महानाट्यासाठीच्या तयारीला वेग आला असून स्टेजसह इतर तयारीला सुरुवात झाली आहे.

यशवंत स्टेडियम परिसरात महानाट्यासाठी स्टेज, सीसीटीव्ही कॅमेरे, कचरागाड्यांची व्यवस्था, साईड पॅनल अशा तयारीला सुरुवात झाली आहे. इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग यशवंत स्टेडियमवर होणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर होणाऱ्या महानाट्याची सुरुवात नागपुरातून व्हावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे. त्यानंतर प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आणि 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात महानाट्याचे सादरीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. या उपक्रमातील पहिला प्रयोग नागपूर येथे होत आहे.

शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंग ‘जाणता राजा ‘ मध्ये दाखविण्यात येणार आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा व महानगरपालिका प्रशासनामार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. दररोज सायंकाळी पाच वाजता नंतर या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट ,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण कलाकार करणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाट्य संमेलन हस्तांतरण सोहळा संपन्न

Mon Jan 8 , 2024
– राज्य शासन कर्तव्य भावनेतून नाट्य चळवळीच्या पाठीशी उभे राहील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – मराठी नाट्यचळवळ अधिकाधिक बहरेल : ना.सुधीर मुनगंटीवारhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 पुणे :- कला, साहित्य, नाटक, संगीत या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात. हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे शासनाचे कर्तव्य असून या कर्तव्यभावनेतून शासन नाट्य चळवळीच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com