अमरदिप बडगे
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुरमाडी/मुरपार या गावात ग्रामपंचायतमध्ये संगणक चालकाची निवड करण्यात आली आहे.परंतु संगणक चालक हा गावातील नागरिक असावा असे नियम असले तरी नियमाची पायमल्ली तुडवत दुस-या गावातील नागरीकाची संगणक चालक पदी निवड करण्याचा प्रकार मुरमाडी /मुरपार गावात घडला आहे.
यावर गावातील प्रहार जनसक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांना याबाबत निवेदन दिले .तरीसुध्दा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
ग्राम पंचायत मधील शासकीय कर्मचारी जो ग्रामसेवक असतो .त्याने यावर आक्षेप का बरं घेतले नाही.यामध्ये जबाबदार कोण आहे.गावातील व्यक्तीला का बरं डावरले .काही पैशाची तर देवाण घेवाण झाली तर नाही ना? अशाप्रकारच्या अनेक प्रश्नांना वाव फुटत आहे.याकडे प्रशासन मात्र कुंभकर्ण बनून झोपेचे सोंग तर घेत नाही .ना.असे देखील या गावातील नागरिक म्हणणे आहे.यावर चौकशी करुन दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी गावातील प्रहार जनसक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.यावर प्रशासन आता कोणती कारवाई करेल याकडे लक्ष गावातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.