येरखेड्यात साकारणार प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणाऱ्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा ऑनलाईन उदघाटन कार्यक्रम उद्या गुरुवार 19 ऑक्टोबर ला सायंकाळी 4 वाजता कामठी तालुक्यातील येरखेडा येथील राज रॉयल लॉन सभागृहात होणार आहे.नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यातील मोठी बाजारपेठ,स्थानिक अर्थव्यवस्थेचे केंद्र,जास्तीत जास्त लोकसंख्या असलेले व दळणवळणची सोय असलेल्या प्रत्येक तालुक्यातुन एक गाव निवडण्यात आले त्यानुसार कामठी तालुक्यातुन येरखेडा गावाची निवड करण्यात आली असून येरखेडा ग्रामपंचायतीत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन होणार आहे.

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे.महाराष्ट्राच्या या अभिनव संकल्पेनेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 19 ऑक्टोबर ला सायंकाळी 4 वाजता ऑनलाईन पद्ध्तीने होणार आहे.या कार्यक्रमाचे प्रक्षेपण कामठी तालुक्यातील येरखेडा ग्रा प च्या वतीने राज रॉयल लॉन सभागृहात दाखविण्यात येणार आहे. अशी माहिती कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Wed Oct 18 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी ५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपाच्या गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे इतवारी स्थित पोस्ट ऑफिस जवळील लक्ष्मी ट्रेडर्स यांच्यावर आणि सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे पाचपावली येथील विशाल क्लोथ फॅक्टरी यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com