नागपूरचे प्रकाश सिंघी घेऊन आले ‘सातारचा सलमान’ 

– चित्रपटातील ‘तुफान’ गाणे प्रदर्शित 

नागपुर – प्रकाश सिंघी, टेक्सास स्टुडिओज निर्मित ‘सातारचा सलमान’ हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाची खासियत म्हणजे अमराठी असलेल्या नागपूरच्या प्रकाश सिंघी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. दरम्यान, ‘सातारचा सलमान’ चित्रपटातील ‘तुफान’ हे प्रेरणादायी गाणे प्रदर्शित झाले असून स्वप्नांचा ध्यास घेणाऱ्या या गाण्याला आदर्श शिंदे यांचा भारदस्त आवाज लाभला आहे. तर अमितराज यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभले आहेत. सुरेश पै सहनिर्मित या चित्रपटाचे लेखनही हेमंत ढोमे यांचेच आहे. तर ‘सातारचा सलमान’मध्ये सुयोग गोऱ्हे, सायली संजीव, शिवानी सुर्वे, अक्षय टांकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हिरो बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाची त्याच्या ध्येयाच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल या गाण्यात दिसत आहे. त्याची मेहनत, त्याचा खडतर प्रवास प्रत्येकालाच सकारात्मकता आणि प्रेरणा देणारा आहे. ‘तुफानाला पार कर, अन तूच हो तुफान’, हे बोलच मनालाखूप भिडणारे आहेत. स्वप्न सत्यात उतरवण्याची ऊर्जा या गाण्यातून मिळतेय.

या गाण्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ” अनेकदा आपल्या आयुष्यात निराशा येते, तुफान येते, ज्याने आपण उद्ध्वस्त होऊ असे वाटते. मात्र त्या तुफानाला पार करून आपण स्वतः जर तुफान झालो तर ही सगळी संकटं आपण दूर करू शकतो आणि सकारात्मक ऊर्जेने आपण पुन्हा उभे राहू शकतो, असा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे. स्वप्न पाहण्यास प्रवृत्त करणारा आणि स्वप्नपूर्तीसाठी प्रोत्साहन देणारा हा चित्रपट आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा ‘सातारचा सलमान’ आहे. येत्या ३ मार्च रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

– भूमिका मेश्राम

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Coal India Limited is awarded the IISWBM-Dave Ulrich Excellence Award CIL Adjudged the Best Inclusive Work Place 

Thu Mar 2 , 2023
Nagpur:-Coal India Ltd was bestowed upon the coveted IISWBM-Dave Ulrich HR Excellence Award in the category of “The Best Inclusive Workplace Awards 2023” in a gala function held in Kolkata today. Vinay Ranjan, Director (P&IR) Coal India Ltd received the award from Professor Dave Ulrich, the number 1 Management guru of the world. While speaking on the occasion, Ranjan highlighted […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com