प्रकाश लोणारे सपत्नीक दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त निवड

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कर्तव्यपथ नवी दिल्ली येथे होणाऱ्या २६ जानेवारी २०२४ प्रजासत्ताक दिन परेड ( RDP. ) २०२४ चे साक्षीदार होण्यासाठी विशेष अतिथी म्हणून नागपुर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील मच्छीमार सहकारी संस्था चळवळीचे आधारस्तंभ प्रकाश लोणारे यांच्या सहपत्नी गीता लोणारे यांना केंद्र सरकारच्या वतीने विशिष्ठ अतिथी म्हणून निवड करण्यात आली.

देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथील कर्तव्यपथ,लाल किल्ल्यावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळयात नागपुर विभागातून शासकीय समितीवर सदस्य म्हणून असलेले प्रकाश लोणारे सपत्नीक २५ जानेवारीला केंद्र सरकारच्या शासकीय खर्चाने विमानाने रवाना होणार आहे. त्यांच्या सोबत निमंत्रित केलेले औरंगाबाद चे तुकाराम वानखडे, कोल्हापूर चे प्रा. एकनाथ काटकर, आनंदराव चौगुले, जालना चे रत्नाकर मेंढरे,बुलढाणा चे राधिका रामकिशन वानखडे, गजानन बावणे, पुणेचे प्रशांत हिरे, बीड चे अशोक लुचारे, मुंबई चे प्रवीण टपके, सिंधदुर्ग चे गुंड कुंडलगावकर, वाशिम चे पल्लवी पानझडे, नाशिकचे सुरेखा वाघधरे, पालघर चे अजित पाटील, नांदेडचे चंद्रसेन पाटील, सांगली चे नाना वाघमारे आदी मान्यवरांची आपल्या सह पत्नीसह उपस्थिती दर्शविणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बीना (संगम) येथील भोई समाजाची अर्चना मेश्राम हीची दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त निवड 

Wed Jan 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील बिना ( संगम ) येथील धिवर समाजाचे विजय महादेव मेश्राम यांची कन्या अर्चना मेश्राम हिची नवी दिल्ली येथे होणा-या २६ जानेवारी २०२४ हया प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड मध्ये महाराष्ट्रातील दहा विद्यार्थीनी मधून निवड झाली आहे. अर्चना विजय मेश्राम ही विद्यार्थीनी नागपूर सदर येथील अन्नासाहेब गुंडेवार महाविद्यालयाची बी.कॉम. अंतीम वर्षाची विद्यार्थीनी आहे. यापुर्वी अर्चना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com