नागपूर :-बहुजन समाज पार्टी ही खऱ्या अर्थाने बहुजन समाजाची पार्टी असून तेच दलित, आदिवासी व ओबीसी समाजाला या देशाचे शासक बनवू शकते, म्हणून ओबीसींनी बसपाला साथ द्यावी व स्वतःला शासक बनवावे असे आवाहन भीम राजभर यांनी केले.
भीम राजभर हे आज बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा व समीक्षा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश बसपाचे केंद्रीय समन्वयक भीम राजभर हे बोलत होते.
भीम राजभर पुढे बोलताना म्हणाले की ओबीसींनी अजून पर्यंत बाबासाहेबांना व त्यांच्या निळ्या झेंड्याला खऱ्या अर्थाने स्वीकारले नाही, त्यामुळे ओबीसींची देशभर दुर्दशा झाली आहे. जर त्यांना आपली स्थिती सुधारायची असेल, दलित आदिवासी व ओबीसींचे नेतृत्व करणाऱ्या बहन मायावतीच्या नेतृत्वातील बसपाला साथ द्यावी. जेणेकरून देशाचे व बहुजनांचे कल्याण साधता येईल.
बसपाचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट संदीप ताजणे यांनी काल झालेली पाटण्यातील पंधरा विरोधी पक्षाची बैठक काय राहुल गांधीची सोयरीक करण्यासाठी बसली होती काय? असा सवाल उपस्थित करून बहनजी शिवाय या देशाच्या प्रधानमंत्री बनण्याची ताकद दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीत नसल्याचा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रातही बॅलन्स ऑफ पावर निर्माण करण्याची शक्ती कार्यकर्त्यांनी निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी व विदर्भाचा प्रभार असलेले एडवोकेट सुनील डोंगरे यांनी विदर्भातून आमदार, खासदार व अनेक महापौर निश्चितपणे निवडून येतील असा विश्वास व्यक्त करून कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस एक करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, रंजना ढोरे, राजीव भांगे, विजयकुमार डहाट, नितीन शिंगाडे, प्रदेश मीडिया मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, शहर प्रभारी सुमंत गणवीर, विकास नारायने, ओपुल तामगाडगे, माजी मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेश्वर, राजू चांदेकर, संजय जयस्वाल, इब्राहिम टेलर, सुरेखा डोंगरे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम ह्यांनी, सूत्रसंचालन जिल्हा प्रभारी प्रा सुनील कोचे यांनी तर समारोप शहराध्यक्ष शदाब खान यांनी केला.
नागपूर जिल्ह्याच्या बाराही विधानसभेतून आलेल्या पदाधिकाऱ्यांची व त्यांच्या कार्याची समीक्षा घेण्यात आली. भीम राजभर यांची नियुक्ती झाल्यावर ते पहिल्यांदाच नागपुरात आल्याने कार्यकर्त्यात भरपूर जोश व लक्षणीय उपस्थिती होती. याप्रसंगी दक्षिण नागपुरातील पन्नासावर मुस्लिम तरुणांनी बसपात पक्षप्रवेश केला हे विशेष