वीजबिल थकबाकी वसुली गतिमान, वरिष्ठ अधिकारी मोहीमेवर

नागपूर :- वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे महावितरणकडून थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम अधिक गतिमान करण्यात आली आहे. या मोहीमेत महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता  अमित परांजपे यांच्यासह अनेक अभियंते, अधिकारी व कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत.

महावितरणच्या वरिष्ठ अधिका-यांनी आज महाल भागातील जानकीनगर, तुलशीबाग व परिसरातील अनेक थकबाकीदार ग्राहकांची भेट घेत, थकबाकीचा भरणा त्वरीत करण्याचे आवाहन केले. याशिवाय थकबाकी वसुलीचे उद्दीष्ट पुर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना केले. नागपूर ग्रामिण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांनी देखील आपल्या सहका-यांसोबत आज सावनेर विभागा अंतर्गत सुरु असलेल्या थकबाकी वसुली मोहीमेत भाग घेत, थकबाकीदार ग्राहकांची भेट घेत वीजबिलाचे पैसे त्वरीत भरण्याचे आवाहन केले.

थकबाकीदारांकडून वीजबिलांच्या रकमेचा भरणा होत नसल्याने महावितरणने वसुली मोहीम गतिमान करण्याबरोबरच वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. थकबाकीदार ग्राहकांची थकीत रक्कम किती आहे? हे न पाहता नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित केलेल्या वीज जोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी केली जात आहे. यात परस्पर इतर ठिकाणावरून अनधिकृत वीज पुरवठा घेतल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे.

शनिवारी व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार

वीज ग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद शनिवारी (दि. 30) व रविवारी (दि. 31) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. यासोबतच वीज ग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाइटवर तसेच महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विना मर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या सेवेचा ग्राहकांनी लाभ घेऊन वीज बिल वेळेत भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जी-२० ने नागपूरच्या सौंदर्यात भर, मनपा आयुक्त, स्मार्ट सिटी सीईओ, दोन अतिरिक्त आयुक्तांनी दिली प्रशासकीय यंत्रणेला गती

Fri Dec 29 , 2023
– सरत्या वर्षातील मनपाच्या कार्याचा आढावा नागपूर :- आनंद, चैतन्य आणि उमेदीने सुरू झालेले २०२३ हे वर्ष आता मावळतीला आले आहे. या सरत्या वर्षाने अनेक कडू गोड आठवणी आणि चिरकाळ स्मरणात रहाव्यात अशा पाउलखुणा उमटविल्या आहेत. नागपूर शहराची पालकसंस्था म्हणून नागपूर महानगरपालिकेने २०२३ या वर्षात अनेक महत्वाचे निर्णय घेतले, अनेक प्रकल्पांना मूर्तरूप दिले, अनेकांच्या स्वप्नांच्या प्रतिपूर्तीत भूमिका बजावली तर संकटाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com