कळमेश्वर :-पोलीस ठाणे कळमेश्वर जिल्हा नागपूर ग्रामीण पोलीसांतर्फे दिनांक १४/०९/२०२४ रोजी वेळ सायं. १७/०० वा. आगामी सण गणेशोत्सव, ईद ए मिलादुन्नबी, मसक-या गणेशोत्सव व विधानसभा निवडणुक संबंधाने अनिल महस्के उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर व पो.नि. मनोज काळबांडे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे कळमेश्वर यांचे अध्यक्षतेखाली रूट मार्च चे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते. सदर रूटमार्च हे पोलीस ठाणे कळमेश्वर येथुन सुरू होउन कळमेश्वर टाउन येथील गुरूगोविंदसिंग चौक (तळयाचीपार) ते बस स्टॅन्ड चौक ते जोड मारोती चौक, बाजार चौक, सब्जी मार्केट ते संत जगनाडे चौक ते रेल्वे स्टेशन ते गुरुगोविंदसिंग चौक, ते ब्राम्हणी फाटा ते कळमेश्वर पोलीस ठाणे येथे समापन असे होते. सदर रूट मार्च मधे पोलीस ठाणे कळमेश्वर येथील ३ अधिकारी, २५ अंमलदार, तसेच दंगा नियंत्रण पथक नागपूर ग्रामीण येथील २४ अंमलदार, पोलीस मुख्यालय येथील १५ अंमलदार, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४ नागपूर, येथील १ अधिकारी २१ अंमलदार, व होमगार्ड पथक कळमेश्वर येथील २० सैनिक असे एकुण ०५ अधिकारी व १०५ पोलीस व होमगार्ड जवानांच्या उपस्थितीत पार पडले.
पोस्टे कळमेश्वर पोलीसांचा रूटमार्च
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com