संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 26 – सेठ केसरिमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता स्व. राकेश कुमारजी पोरवाल पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरु माननिय डॉ. संजय दुधे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाप्रसंगी स्व. राकेश कुमारजी पोरवाल यांच्या स्मृतीत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण प्रसारक मंडळ कामठीचे सचिव श्री. विजय कुमारजी शर्मा, प्राचार्य डॉ. विनय चव्हाण आणि कार्यक्रम समन्वयक उपप्राचार्या डॉ. रेणू तिवारी यांनी समस्त शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि शुभचींतकाना या प्रसंगी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.