शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये मिळणार पॉलिक्लिनिक सेवा

गडचिरोली :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र गोकुलनगर व रामनगर गडचिरोली येथे विशेष तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून विशिष्ट सेवा पुरविण्याकरिता आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांच्या हस्ते सुरवात करण्यात आले. सदर सेवांचा उद्देश म्हणजे स्त्री रोग उपचार, बालरोग उपचार, नेत्ररोग उपचार, कान-नाक-घसा रोग उपचार, मानसिक रोग उपचार, त्वचा रोग उपचार इत्यादी रुग्णांना तज्ञ डॉक्टरांकडून विशिष्ट प्रकरच्या सेवा पुरविणे हा आहे. तरी या शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रातील विशेष सेवांचा नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.

सदर कार्यक्रमास डॉ अमित साळवे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली, डॉ सचिन हेमके जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ रुपेश पेंदाम जिल्हा साथरोग अधिकारी, डॉ प्रफुल गोरे वैद्यकीय अधिकारी, डॉ सिमा गेडाम वैद्यकीय अधिकारी नागरी प्रा आ केंद्र गोकुळनगर, डॉ संघटित रायपुरे नागरी प्रा आ केंद्र गोकुलनगर उपस्थितीत होते. मुख्याधिकारी नगर परिषद गडचिरोली सुर्यंकांत पिदुरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका, लेखापाल, आशा स्वयंसेविका, यांच्या सहकार्यातून कार्यक्रम पार पडला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपच्या जनविरोधी निर्णयांमुळे 7 दिवसांपासून 1 लाखांहून अधिक प्रवासी त्रस्त

Thu Oct 10 , 2024
नागपूर :- नागपूर शहर बस सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे, आणि तेही सलग सात दिवसांपासून, ज्यामुळे दररोज 1.12 लाखांहून अधिक नागरिक, ज्यामध्ये विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आहेत, यांना परीक्षांच्या काळात आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्रास सहन करावा लागत आहे. हे सर्व भाजपच्या जनविरोधी विचारसरणी आणि निर्णयांमुळे घडत आहे,” असा आरोप पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस समितीचे अध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com