पोलिसांची दंगा नियंत्रण मॉक ड्रिल यशस्वी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- सद्रक्षणाय खलनिग्रहनाय या ब्रीद वाक्यनुसार परिसरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची मुख्य जवाबदारी ही पोलिसांवर असते तेव्हा आगामी काळात होणाऱ्या सणोत्सव दरम्यान अचानक एखादी मोठी अनुचित घटना घडून कायदा व सुव्यस्थाचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासन किती कटिबद्ध राहू शकते याची परीक्षण चाचणी म्हणून आज सायंकाळी 6 दरम्यान नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह समोर परिसरात पोलीस प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करणाऱ्या आंदोलनकाराणा पांगविण्यासाठी पोलीस प्रशासन गांभीर्याने किती वेळेत योग्य ती भूमिका घेऊ शकते यासाठी पोलिसांची घेण्यात आलेली रिहर्सल मॉक ड्रिल यशस्वी पार पडली.

स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दरगाह समोर काही नागरिक तणावपूर्ण वातावरण निर्माण करून रस्त्यावरच जाळपोळ करण्यासह पोलीस प्रशासन विरोधात रोष दर्शवित असल्याचो गुप्त माहिती पोलिसांच्या गुप्त विभागाला मिळताच नवीन कामठी पोलीस स्टेशन चे गुप्त विभागाचे अखिलेश ठाकूर यांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलन काऱ्यांची चित्रफीती कॅमेऱ्यात कैद करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहितो देण्यात आली याप्रसंगी बघ्यांची एकच गर्दी जमली असून दोन्ही बाजूची वाहतूक ही बंद करण्यात आली होती तर बऱ्याच वेळे नंतर एकीकडे आंदोलना ला तेज गती मिळत असल्याचे दृश्य निर्माण होताच त्वरित एसीपी विशाल क्षीरसागर,

नविन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले व तणावपूर्ण स्थिती नोयंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल बोलाविण्यात आले दरम्यान पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी आदींनी घटनास्थळो पोहोचून अग्निशमन दल, एंबुलेन्स पाचारण करोत आंदोलन काऱ्यांशी संवाद साधल्या नंतर आंदोलन कारि समजण्या च्या पलीकडे जाऊन पोलिस प्रशासन वि रोधात नारेबाजी करीत पोलिसांना आव्हान देत असल्याने त्यांना चोख प्रतिउत्तर देत सौम्य लाठीचार्ज चा देखावा करताच आंदोलन काऱ्यानो एकच पळ सोडला दरम्यान जवळपास पाच जणांना तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेण्यात आले याप्रकारे पोलीसांच्या वतीने घेण्यात येणारी मॉक ड्रिल यशस्वी ठरली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपूर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

Tue Mar 11 , 2025
नागपूर :- दिनांक १०.०३.२०२५ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये १७ केसेसमध्ये एकुण २० ईसमावर कारवाई करून रू. ३,४८,३६०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ०४ केसेसमध्ये एकुण ११ ईसमावर कारवाई करून रू. ८,२९०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ४,९५६ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!