कोंढाळी :- दिनांक १२/०६/२०२३ रोजी पोलीस स्टेशन कोंढाळी येथे फिर्यादी नामे- दुर्गादास चंपत किनेकर, वय ५३ वर्ष, रा. कामठी मासोद ता. काटोल यांनी तोडी रिपोर्ट दिली की, दिनांक ११/०६/२०२३ १२.०० वा. ते दिनांक १२/०६/२०२३ चे ०७.०० वा. दरम्यान त्यांचे मासोद शिवारातील शेतातील कोठयातील ए. आय. कंपनीची ०३ एच. पी. ची विहीरीतील मोटर किंमती २०,०००/- रु. ची कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली अशा तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे कोंढाळी येथे अप क्र. ४९८ / २३ कलम ४५४, ४५७, ३८० भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हयाचे तपासात गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे- १) आकाश देविदास नेहारे, वय २७ वर्ष, २) प्रभाकर महादेव नेहारे, वय ३५ वर्ष, रा. दोन्ही रा. कामठी (मासोद) ता. काटोल यांना दिनांक १२/०६/२०२३ रोजी ताब्यात घेवुन विचारपुस केला असता गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीतांना गुन्हयामध्ये अटक करून त्यांचे कडुन गुन्हयातील ए. आय. कंपनीची ०३ एच. पी. ची विहीरीतील मोटर किमती २०,०००/- रू. ची जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर, अति कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग बापू रोहम, सहायक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे पोस्टे कोंढाळी, पोलीस नायक सुनील ठोंबरे, पोलीस शिपाई गोविंद मंद पोस्टे कोंढाळी यांनी केली आहे.