मौजा उमठा पारधी बेडा येथील हातभ‌ट्टी चालकांवर पोलीसांची रेड कारवाई

– जलालखेडा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची संयुक्त प्रतिबंधक कारवाई

जलालखेडा :- पोलीस ठाणे जलालखेडा हद्दीतील मौजा उमठा, पारधी बेडा येथे मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून आजूबाजूचे परीसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने पोलीस स्टेशन जलालखेडा हद्दीतील मौजा उमठा, पारधी वेडा येथे सुरू असलेल्या मोहाफुल गावठी दारू भ‌ट्टीवर रेड केली असता ०३ महिला व ०१ पुरूप आरोपी नामे राजेंद्र जनार्दन पवार, वय ४९ वर्ष, रा. उमठा पारखी बेडा यांचे ताब्यातून एकुण १) प्लस्टिक डबकित एकूण १३० लिटर मोहाफुल गावठी दारू एकूण किंमती ६५००/-रू. २) २००० लिटर मोहफुल सडवा रसायन एकूण किंमती ४००००/-रू. व इतर दारू गाळण्याचे साहित्य मिती ८०००/-रू, असा एकुण ५४५००/-रू. चा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. जप्त मुद्देमाल व कागदपत्र पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे जलालखेडा यांचे ताब्यात देण्यात आले. ०४ आरोपीतांविरूद्ध कलम ६५(ई), (एफ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये ०४ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रमीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), मा. अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनी मनोज गदादे, सपोनी आशिष ठाकूर, सफौ मिलिंद नांदुरकर, पोहवा दिनेश अधापुरे, पोहवा ईकबाल शेख, पोहवा रोशन काळे, पोहवा संजय बरोदीया, पोहवा प्रमोद भोयर, पोना वीरेंद्र नरड, मपोहवा नितु रामटेके, मपोहवा कविता वचले, पोशी अभिषेक देशमुख, पोशी धोंडुतात्या देवकते, चापोहवा अमोल कुथे, चापोहवा मुकेश शुक्ला, चापोशी शेषराव यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अल्पवयीन अपहृत मुलीचा घेतला शोध

Mon Sep 16 , 2024
– अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष नागपूर ग्रामीणची कारवाई रामटेक :- पोलीस स्टेशन रामटेक येथे दाखल गुन्हा क्र. ४१/२०२४ कलम ३६३, ३७० भादंवि गुन्ह्याचे तपासात ०७ महीने पुर्ण होवुनही यातील अल्पवयीन अपहृत मुलीचा आणि संशयीत आरोपीचा शोध शोध न लागल्याने पोलीस अधिक्षक, नागपुर जिल्हा नागपुर ग्रामीण यांनी अनैतीक मानवी वाहतुक प्रतीबंधक कक्ष, नागपुर ग्रामीण यांना सदर गुन्हयाचा तपास करण्याचे आदेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com