संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नुकत्याच संपन्न झालेल्या आस्ट्रेलिया-इंडिया वर्ल्ड कप सामन्यात लावण्यात येणाऱ्या कळमना रोड वरील एपेक्स टेलर दुकानासमोर गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असून या धाडीतून एका आरोपीस अटक करण्यात आले असून आरोपी कडून नगदी 700 रुपये व दोन महागडे मोबाईल असा एकूण 30 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अटक आरोपीचे नाव शेख रहीम मो रफी वय 37 वर्षे रा पिली हवेली कामठी असे आहे.