नागपूर :- महाराष्ट्र पोलीस स्थापना सप्ताह २०२५ (रेजींग डे) अंतर्गत परिमंडळ ०३ अंतर्गत पोलीस ठाणे पाचपावली, शांतीनगर, कोतवाली, गणेशपेठ, व तहसील हद्दीतील पर्यावरण संरक्षण कायदया अंतर्गत दाखल गुन्हयातील मुद्देमाल मांझा, चकी, वंडल, पतंग ईत्यादी मुद्देमाल मा. न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्याने, महक स्वामी, पोउपआ परिमंडळ क. ०३, श्रीमती श्वेता खाडे, सपोआ लकडगंज विभाग, संतोष खांडरे, तहसिलदार, नागपुर शहर, यांचे समक्ष पोलीस ठाणे पाचपावली येथील मोकळया जागेत मांझा, चकी, बंडल, ईत्यादी एकुण ३०,४५,४५५/- रू. चा मुद्देमाल रोलर मशीनने दावुन निरूपयोगी करण्यात आला. व डंम्पोंग यार्ड येथे नष्ट करण्यात आला, याप्रसंगी परिमंडळ क ०३ अंतर्गत सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी व अंमलदार हजर होते.
पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर परिमंडळ क. ३ अंतर्गत, पर्यावरण संरक्षण कायदयातील जप्त मुद्देमाल नष्ट
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com