पोलिसांच्या अभयपणामुळे कामठीत चोरीसह इतर गुन्ह्याचे प्रमाण वाढीवर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

-कामठी शहर क्राईम हब च्या मार्गावर

कामठी ता प्र 1 ऑगस्ट :- माजी पालकमंत्री व विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृहक्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कामठी शहरात पोलिसांचा अभयपणामुळे मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचा ग्राफ वाढीवर असून चोरीचे प्रमाण वाढीवर आहेत तर कामठी हे शहर क्राईम हबच्या मार्गावर आहे तर येथील सर्वसामान्य नागरिक स्वतःला असुरक्षित मानीत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढीवर असून पोलिसांचा अभयपणा तयार झाला आहे तेव्हा पोलिसांच्या या अभयपणाला कोण जवाबदार? असा प्रश्न येथील जागरूक नागरिक वर्ग करीत आहे.
मागील वर्षी कुंभारे कॉलोनीत वास्तव्यास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर अवैध व्यवसायिकांनि हल्ला चढवला होता, येरखेडा येथे पोलिसांची कॉलर पकडली होती, नुकतेच आरोपीने न्यायालयातून पळ काढला होता इतकेच नव्हे तर मागील काही दिवसांपासून जणू चोरीचे सत्रच सुरू झाले आहेत. ज्यामुळे येथील नागरिक स्वतःला असुरक्षित मानत आहेत.सद्रक्षणाय-खलनिग्रहनाय हे ब्रीदवाक्य बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांची येथील सर्वसामान्य नागरिकापासून ते आरोपी वर्गातील गुंडप्रवृत्ती नागरिकांना कुठलीही भीती न राहिल्याने पोलिसांच्या या अभयपणाला कोण जवाबदार?मिळालेला मानवाधिकार की वाढत असलेला भ्रष्टाचार ? या चर्चेला उधाण मिळत आहे.नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या परिमंडळ क्र 5 हद्दीतील स्थानिक नवीन व जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांनी आपले जाळे पसरवले असले तरी बिघडलेली मानसिक विकृती व राग अनावर न घेणे तसेच पोलिसांच्या अभयपणा मुळे गुन्हेगारीच्या घटना वाढीस असल्याचे निदर्शनास येते.
पोलिसवर्ग जनसामान्यांसाठी सदैव तत्पर राहून कर्तव्यदक्ष भूमिका बजावून नोकरी करतो ज्या पोलिसांना हे ब्रीद बाळगून आपले कर्तव्य बजावता येत नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा असे राज्याचे तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक डॉ सत्यपाल सिंह यांनी 14 जून 2012 ला संपन्न झालेल्या नवीन कामठी पोलीस स्टेशन च्या नवीन इमारत उदघाटन प्रसंगी बोलत होते.सज्जनांच्या हितासाठी तर दुर्जनांच्या नियमनासाठी असा अर्थ पोलिसांसाठी असला तरी सध्या या अर्थाला काही राम उरलेला नाही. तरीसुद्धा सर्वच पोलीस सारखे नसतात अनेकवेळा पोलिसानी आपल्याप्रति चांगल्या कामाची पावती देऊनही त्याचे मूल्यमापन होत नाही कारण एकाला समाधान तर दुसऱ्याच्या वाट्याला दुःख येत असते.मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1933 च्या कलम 12 प्रमाणे सन 2001 ला महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली या हक्काची पायामल्ली करणाऱ्या च्या विरोधात पीडित व्यक्तीला मानवी हक्क आयोगाकडे दाद मागता येते. देशाच्या राज्यघटनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचे मनानुसार जगण्याचा अधिकार आहे हा आयोग स्थापन होऊन नागरिकांना त्याची जाणीव, माहिती झपाट्याने व्हायला लागली ती सर्वसामान्य नागरिकापासून ते गुन्हेगार प्रवृत्तीच्या नागरिकांपर्यंत पोहोचली त्यामुळे पोलिसांचे हात कायद्याच्या चौकटीत एक प्रकारे बांधल्या सारखे झाले परिणामी गुन्हेगारांना मारझोड करता येत नसल्याने गुन्हेगारांची हिम्मत दिवसेंदिवस वाढीवर आहे. त्याचप्रमाणे एखाद्या गुन्हेगारी घटनेत न्यायालय जोपर्यंत एखाद्या गुन्हेगारास पोलीस कोठडीचा आदेश देत नाही तोपर्यंत पोलीसांना त्याला मारझोड ही करत नसल्याचे सांगण्यात येते.
या सर्व बाबींचा विचार केला असता मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीचा ग्राफ वाढीवर असून गंभीर गुन्ह्यांची नोंद दिवसेंदिवस वाढीवर आहे .त्यातही अवैध व्यवसायिकांचे मनोबल वाढलेले आहे तेव्हा कायद्याचे रक्षक म्हणून भूमिका साकारणाऱ्या पोलीस दादांनी या शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासह निर्दोष लोकांचे रक्षण व्हावे यासाठी अभिनव संकल्पना चा उपयोग करून वाढीव गुन्हेगारीला आळा बसवावा अशी मागणी येथील जागरूक नागरिक वर्ग करीत आहे.
आगामी काळात कामठी नगर परिषद निवडणुकीचा ज्वर चढणार आहे दरम्यान प्रतिस्पर्धी आपली रणनीती आखत साम, दाम, दंड , भेद या सर्व बाबींचा वापर करून निवडणूक रिंगणात जिंकण्यासाठी जीवाचे रान करणार आहेत आणि पोलिसांचा अभयपणा असल्यामुळे व पोलिसांचा कुठलाही धाक नसल्यामुळे घरावर हल्ला चढवीने हे सर्वसाधारण झाले आहे तेव्हा या निवडनुकीच्या काळात वैमनस्याच्या स्पर्धा कुणाच्या जीवावर न बेतावे यासाठी आतापासूनच सावधगिरी सांभाळणे गरजेचे आहे मात्र येथील पोलीस प्रशासन शहरातील बिघडलेली स्थिती व निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीत कुठलीही गंभीर्याची भूमिका घेताना दिसत नाही.स्थानिक पोलीस फक्त अवैध व्यावसायिकाकडून मलिदा लाटण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कन्हान ला थाटात साजरी

Mon Aug 1 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – शहर विकास मंच द्वारे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची १०२ व्या जयंती संताजी नगर कांद्री-कन्हान येथे थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा कांद्री ग्राम पंचायत सदस्य सिंधुताई वाघमारे यांच्या हस्ते व मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे, ताराचंद निबांळकर, प्रल्हाद वाघमारे यां च्या प्रमुख उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून कार्यक्रमा ची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com