– स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण ची कारवाई
सावनेर :- दिनांक ११/०६/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण येथील पथक सावनेर उपविभागात अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत मौजा खुमारी शिवार येथे गोपनिय बातमीदारांकडुन खात्रीशीर बातमी मिळाला की, मौजा खुमारी शिवारातील नटरंग फॉर्म हाउसचे एका खोलीमध्ये काही इसमे ५२ ताम्रपत्त्यावर पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांना प्राप्त झाली यावरून सदर पथकाने मौजा खुमारी शिवार येथे सापळा रचुन छापा टाकून आरोपी क्र.. १) राजेश नंदलाल गौर, वय ३५ वर्ष, रा. माना मंदीर जवळ, टेका नाका कामठी रोड नागपूर २) रूपेश यशवंत नंदनवार, वय ४४ वर्ष, रा. दिलीप आटा चक्की जवळ नाईकवाडी बांग्लादेश नागपूर ३) श्रावण एकनाथ पराते, वय ४५ वर्ष, रा. लालगंज नाईकवाडी कळमना मार्केट नागपूर ४) नितीन परसराम चंदनखेडे, वय ३४ वर्ष, रा. ५६ गल्ली नं. ०५, शक्तीमाता नगर, नंदनवन नागपूर ५) विलास रामभाऊ पौनिकर, वय ४८ वर्ष, रा. शिवाजी पार्क वाठोडा नागपूर ६) निखील नारायण अग्रवाल, वय ३० वर्ष, रा. ए.बी.सी अपार्टमेंट टेलिफोन एक्सचेंज चौक सि.ए रोड नागपूर ७) विपीन अशोक मानसे, वय ३० वर्ष, रा. जुनी मंगळवारी सि. ए. रोड नागपूर ८) विनोद श्रीधर मुळे, वय ५३ वर्ष, रा. हनुमान मंदीर जवळ शेष नगर मानेवाडा नागपूर ९) बबन वामनराव बुचे, वय ४२ वर्ष, रा. पोलीस स्टेशन पाचपावली समोर तांडापेठ नागपूर १०) ज्ञानेश्वर वसंता पराते, वय ४२ वर्ष, रा. लालगंज नाईकवाडी नागपूर ११) श्रीधर रामाजी तथकडे, वय ५० वर्ष, रा. भावना हार्डवेअर समोर जुनी मंगळवारी सि. ए रोड नागपूर १२) गजानन मोरेश्वर गेचोडे, वय ३५ वर्ष, रा. हनुमान मंदीर जवळ रमना मारोती नगर, नंदनवन नागपूर १३) अमोल हिरालाल गोतमारे, वय ३५ वर्ष, रा. साईबाबा नगर, खरबी नागपूर १४) संजय तामसिंग उमरे, वय ५० वर्ष, रा. माताघरेगोतमारे, वय ३५ वर्ष, रा. साईबाबा नगर, खरबी नागपूर १४) संजय तामसिंग उमरे, वय ५० वर्ष, रा. माताघरे मोहल्ला जुनी मंगळवारी लकडगंज नागपूर हे तासपत्त्यावर पैशाची बाजी लावुन जुगार खेळतांनी मिळून आले. एकुण १४ जुगारी इसम यांना ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन एकूण नगदी २,९७,२८० /- रू. १४ मोबाईल किंमती १,४९,०००/- तसेच चारचाकी वाहन किंमती ३२,००,०००/- रु. व ५२ खुले तारूपले व तीन तासपले पॅकेट. किंमती २००/- रु. असा एकूण ३६,४६,४८०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीताविरुद्ध पोलीस ठाणे सावनेर येथे कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीतांना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पोलीस ठाणे सावनेर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर बापू रोहम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, पोलीस हवालदार मयुर डेकळे, पोलीस नायक सत्यशील कोठारे, अमृत किंनगे, रोहन डाखोरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली..