– पोलीस स्टेशन कोंढाळी नागपुर ग्रामीण ची कारवाई
कोंढाळी :- दिनांक १२/०६/२०२३ रोजी पोलीस स्टेशन कोंढाळी येथील स्टाफ अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन कोंढाळी येथील रिंगणाबोडी शिवारात काही इसम ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोलीस स्टेशन कोंढाळी येथील स्टाफ यांना प्राप्त झाली या वरून सदर पथकाने रिंगणाबोडी शिवार येथे सापळा रचुन छापा टाकून आरोपी नामे- १) मंगेश मंगल पेंदाम, वय ३८ वर्ष, रा. गोंडवाना चौक नागपूर २) अखिलेश राजेंद्र सहानी, वय ३० वर्ष, रा. फ्रेंड्स कॉलनी नागपूर ३) निलेश राजेंद्र शाहु, वय ३२ वर्ष, रा. रमाई नगर नागपूर ४) स्वप्नील कृष्णराव धोटे, वय ३३ वर्ष, रा. गिट्टीखदान नागपूर ५) सुनिल भोलेश्वर जामगडे, वय ३९ वर्ष, रा. संत कबिर नगर नागपूर ६) प्रफुल रामकृष्ण गडकरी, वय ३६ वर्ष, रा. सेमिनरी हिल्स नागपूर ७) शिवानंद रामप्रकाश सिंग, वय ३० वर्ष, रा. फ्रेंड्स कॉलनी नागपूर ८) लितेश प्रकाश आत्राम, वय ३८ वर्ष, रा. फ्रेंड्स कॉलनी नागपूर ९) संजय तुर्केल, रा. नागपूर (मालक) हे जुगार खेळतांनी मिळून आले. एकुण ०८ जुगारी इसम यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातून नगदी ५९,६६० /- रू. ०३ कार, ०९ मोबाईल व दोन विदेशी दारूचे बॉटल असा एकुण किंमती अंदाजे ३९,७८,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीतांविरुध्द पोलीस ठाणे कोंढाळी येथे अप क्र. ४९७/२०२३ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम सहकलम ६५ (ई) म. दा. का. सहकलम १०९ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग बापू रोहोम, पोलीस स्टेशन कोंढाळी येथील ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कांवडी, सहायक फौजदार भोजराज तांदुळकर, पोलीस नायक मंगेश मसने, नितेश राठोड, सुनिल ठोंबरे, पोलीस शिपाई मंगेश सावरकर, गोविंद मंद, महिला पोलीस शिपाई जया नेवारे, तृप्ती दाते, उपा शिंदे, चालक पोलीस शिपाई अनिल ढोके यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.