प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकानांवर मनपाची कारवाई

नागपूर, ता. ८ : प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई अधिक कठोर केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या  दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.

          मंगळवारी (ता.८) धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धरमपेठ, गोकुलपेठ बाजार येथील तुमळे ड्राय लाँड्री ॲण्ड ड्राय क्लीन वर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय पथकाद्वारे धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील आनंद किराणा स्टोअर्स  आणि नरेन्द्रनगर येथील आशिष मोंडक या दुकानावर कारवाई करून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे गांधीबाग झोन अंतर्गत नंगापुतला चौक येथील शिवाजी प्लास्टिक या दुकानावर कारवाई करून ५ हजार रुपये दंड वसूल केला. मनपाद्वारे दररोज मनपा कर्मचारी, उपद्रव शोध पथकाचे जवान प्रत्येक बाजारपेठेत, भाजी मार्केट आणि अन्य ठिकाणी प्लास्टिक पिशवीचा उपयोग करणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.

          उपद्रव शोध पथकाने मंगळवारी ४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २० हजार रुपयांचा  दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अत्याचाराविरोधात आवाज उठवा, एकमेकींना सहकार्य करा : भुवनेश्वरी एस.

Tue Mar 8 , 2022
महिला दिनानिमित्त मनपातर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार नागपूर, ता. ८ : महिलांमध्ये व्यवस्थापन आणि नेतृत्वाची मोठी ताकद आहे. त्यांच्यातील संयम हा सर्वात मोठा गुण आहे. मात्र त्याचा फायदा घेतला जात असले तर शांत बसू नका. कामाच्या ठिकाणी किंवा घरी, कुठल्याही ठिकाणी, शारीरिक, मानसिक, शाब्दिक असा कुठल्याही प्रकारचा छळ होत असल्यास सहन करू नका. आपल्या जवळच्या महिलांनाही तो सहन करू देउ नका, एकमेकींना सहकार्य करून अत्याचाराविरोधात आवाज उठवा, असा मौलिक सल्ला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!