छायाचित्र प्रदर्शन, अवघे तीन दिवस बाकी  

 छायाचित्र रसिकांसाठी पर्वणी

नागपूर :- जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शन झिरो माईलजवळील जिल्हा मध्यवर्ती संग्रहालयात 17 मार्चला सुरु झाले असून 24 मार्च पर्यंत सर्व नागरिकांसाठी पहावयासाठी नि:शुल्क खुले आहे. नागपूर शहरामध्ये जी -20 अंतर्गत सिव्हिल 20 या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे औचित्य साधून छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या छायाचित्र स्पर्धेला छायाचित्रकारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. त्यातील निवडणूक व बक्षिसपात्र छायाचित्र या प्रदर्शनात पहावयास मिळणार आहे. अवघे तीनच दिवस बाकी असून जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी यांनी या प्रदर्शनाचे कौतुक केले आहे. यासोबत अनेक मान्यवर अधिकारी व कर्मचारी तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली आहे. झिरो माईलजवळील जिल्हा मध्यवर्ती संग्रहालयात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयांवरील दर्जेदार छायाचित्रे यावेळी पहायला मिळणार आहे. नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन आणि जिल्हा मध्यवर्ती संग्रहालय यांचे विशेष सहकार्य या प्रदर्शन आयोजनासाठी मिळाले आहे.

छायाचित्र

विदर्भातील वाघांचे अस्तित्व व जंगल, नागपूर हेरिटेज, नागपुरातील सण, उत्सव, खाणपान व परंपरा, जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि , पर्यटनस्थळे आणि प्रेरणास्थळे आदी छायाचित्र प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहेत. छायाचित्र रसिकांसाठी ही एक पर्वणी आहे. या छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ एकदा तरी अवश्य घ्यावा.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

काँग्रेस नेते गिरीश पांडव यांचे नागपूर विद्यापीठात वर्चस्व कायम 

Thu Mar 23 , 2023
नागपूर :- नुकत्याच झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सिनेट निवडणुकीत काँग्रेस नेते गिरीश पांडव यांनी आपले वर्चस्व कायम राखत वीस वर्षांपासून सिनेट सदस्य असलेले ॲड.मनमोहन वाजपेयी यांना पुन्हा एकदा विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्या विद्यार्थी संग्राम परिषदेच्या माध्यमातून वाजपेयी हे महाविकास आघाडीच्या गटात सहभागी झाले होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गटाचा पराभव झाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com