‘फोनिक्स’चा पीएम सडक योजनेवर ‘दरोडा’!

संदीप बलविर, प्रतिनिधी

# स्वतः घेतलेला कंत्राट दिला ‘पेटी कंत्राटा’त

# कमिशनपोटी दुप्पट कमाई, निकृष्टतेवर भर

नागपूर :- संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या ‘कोल स्केम’ प्रमाणे आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कोट्यावधीच्या निधीवर अधिकारी आणि केवळ कागदावर कंत्राटदार असलेल्या कंपन्या संगनमताने दरोडा टाकत आहेत. दरोडाच नव्हे तर संगनमताने योजनेचे लचकेहो तोडत आहे. त्यामुळे पेटी कंत्राटदार हा निकृष्टतेवर भर देत आहे.असाच योजनेतील एक घोटाळा नागपुर ग्रामीण तालुक्यात बोरखेडी (रेल्वे) ते आलगोंदी ते टेम्भरी ते खर्डा ते तामसवाडी ते आष्टा राज्य महामार्ग ५३ येथे ऊघडकीस आला आहे.

सध्याघडीला नागपूर ग्रामीण तालुक्यातील बोरखेडी (रेल्वे) ते आलगोंदी ते टेम्भरी ते खर्डा ते तामसवाडी ते आष्टा राज्य महामार्ग ५३ पर्यंत एकूण १४.३० किमी लांबीच्या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण रस्ते विकास संस्था,नागपूर द्वारा सुरू आहे.या १४.३० की मी रस्त्याचे काम फोनिक्स इंजिनिरींग कंपनीला ६२६.३८ लक्ष रुपयाला दिले आहे.त्यात १३.६७ किमी डांबरी रस्ता,०.६३० किमी काँक्रीट रस्ता व २४ मोऱ्या बांधकामाचा समावेश आहे.परंतु फोनिक्स इंजिनिरिंग कंपनीने स्वतः घेतलेला हा कंत्राट श्री ट्रेडिंग अँड कॉन्स्ट्रुकॅशन कंपनीला पेटी कंत्राटात दिला असल्यामुळे फोनिक्स इंजिनिरिंग कंपनी फक्त कागदी घोडे चालवायचे करोडो रुपयांचे कमिशन खात असल्याचे दिसून येते.वास्तविक कामाची किंमत व पेटी कंत्राट दिल्याची किमंत यात खूप तफावत असल्यामुळे पेटी कंत्राटदार हे रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून त्यांच्या निकृष्ट कामाबद्दल व धुळीमुळे होत असलेल्या त्रासाबद्दल नागपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती व विध्यमान प स सदस्य संजय चिकटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊन अवगत केले तरी कमिशनच्या मलाईत हातासह तोंडही भरले असल्यामुळे संबंधित कामाकडे अधिकारी लक्ष देत नसल्याने पेटी कंत्राटदाराचे चांगलेच फावते आहे.त्यामुळे रस्त्याने उडणारा धूळ,रस्त्याच्या कडेला टाकलेली गिट्टी रस्त्यावर येऊन रस्ता अरुंद झाला तरी कंत्राटदार व अधिकारी यांना काहीही देणे घेणे नाही.

विशेष बाब अशी की,संबंधित काम हे १५ डिसें २०२१ पासून सुरू होऊन १४ डिसें २०२२ ला पूर्ण करायचे होते.त्याप्रमाणे या कामाचा कंत्राट फोनिक्स इंजिनिरिंगला देण्यात आला होता.परंतु फोनिक्स इंजिनिरिंग ने कंत्राटा चे कागदी घोडे नाचविण्यासाठी व पेटी कंत्राटदार शोधण्यामध्येच टाईम घालवल्यामुळे ज्या कालावधीत हे काम पूर्ण करायचे होते प्रत्यक्षात तेव्हा पासून कामाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे काम लवकर पूर्ण करण्याचे उद्दीस्ट नजरेसमोर ठेवत पेटी कंत्राटदार कामात धार सोडपणा करीत असल्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.परंतु या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे कोणत्याही सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता लक्ष देत नसल्याने कागदावरील कंत्राटदार व अधिकारी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीवर संगनमताने दरोडा टाकत असल्याचे दिसून येते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र उद्घाटनासाठी सज्ज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

Wed Apr 5 , 2023
नागपूर :- कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण पूर्व पाहणी केली. सचित्र रामायण व भारतीय स्वातंत्र्य लढ्यांचे दालन या दुमजली इमारतीत साकारले आहे.            भारत देशाच्या पौराणिक, ऐतिहासिक वैशिष्ट्यांसह स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या योगदानाची सचित्र माहिती दर्शविण्यात आलेल्या या सांस्कृतिक केंद्राची इमारत उद्घाटनासाठी सज्ज झाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com