नागपूर :- 2022 पासून पात्र असलेल्या अनुसूचित जातीच्या 761 पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना अजून पर्यंत फेलोशिप न मिळाल्याने हे विद्यार्थी पुना ते मुंबई असा लॉंगमार्च काढून आजपासून पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत एचडी संशोधक विद्यार्थ्यांचे हे तिसरे आंदोलन आहे. यापूर्वी पुण्यात बार्टी कार्यालयापुढे 120 दिवस विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तर मुंबईत च्या आजाद मैदानावर 40 दिवस आंदोलन केले. तर आता हा आजपासून पायी लॉंगमार्च काढून 19 तारखेला हे सर्व विद्यार्थी मंत्रालयावर धडक देतील.
महाराष्ट्र शासनाचे जातीयवादी व पक्षपातीपूर्ण धोरण असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांचा आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात 24 जून रोजी विद्यार्थ्यांच्या वतीने निवेदने देण्यात आली होती. नागपुरातील विद्यार्थ्यांनी 24 जून रोजी निवेदन देताना मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी या अधिवेशनात जर घोषणा केली नाही तर अर्थमंत्री व पालकमंत्री यांच्या घरासमोर निदर्शने करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला होता.
आज पुणे विद्यापीठ परिसरातून शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांना अभिवादन करून पायी निघालेला विद्यार्थ्यांचा लॉंगमार्च 12 ला आकुर्डी, 13 ला देहूगाव, 14 ला लोणावळा, 15 ला खोपोली, 16 ला पनवेल, 17 वाशी, 18 ला दादर येथे मुक्काम करत करत 19 ला ते मंत्रालयावर पोहोचणार आहेत.