वर्धा – 60 व्या राष्ट्रीय फार्मसी सप्ताह 2021 च्या निमित्ताने, दि. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, बोरगाव (मेघे), वर्धा यांनी आंतर महाविद्यालयीन ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते ज्यामध्ये राज्यभरातील विविध महाविद्यालयातील संघांनी भाग घेतला होता.
हि प्रश्नमंजुषा स्पर्धा फार्मास्युटिकल सायन्स क्षेत्रातील चालू घडामोडी आणि क्रीडा यावर आधारित होती. दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील श्री आदित्य वनवे आणि श्री. मयूर रहांगडाले बी.फार्मसी द्वितीय वर्षातील या दोन विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. तसेच दोघांनी उत्कृष्ठ कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला व त्यांचे विजेता ट्रॉफी व रोख बक्षीस रुपये 1500 देऊन गौरव करण्यात आले.