गोरेवाडा प्राणी उदयानात कृत्रीम उबवणीने मोरांचा जन्म

नागपूर :-बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उदयानात कृत्रीम पद्धतीने अंडी उबवून मोराच्या ६ पिल्लांचा दि. २२/०८/२०२३ रोजी यशस्वी जन्म झाला.

दि. १२/०८/२०२३ रोजी उदयानाच्या परिसरात गवत कटाई दरम्यान गवतामध्ये एकूण ७ अंडी सापडली होती. आजूबाजूच्या परिसरात गवत कापणी झाल्याने लांडोरीने हे घरटे सोडून दिले होते. दिवसभर लक्ष ठेऊन मादी घरटयात न परतल्याने प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने सदर अंडयाना कृत्रीम पद्धतीने उबविण्याचा निर्णय घेतला. उदयानातील वनअधिकारी सारिका खोत यांनी पंचनामा करून सदर अंडी प्राणीसंग्रहालय कर्मचा-यांकडे सुपूर्त केली.

या अंडयाना बल्बच्या उष्णतेने उपवण्याची कृत्रीम व्यवस्था करण्यात आली. दि. २९/०८/२०२३ रोजी रात्री उशिरा २ पिल्ले अंडयातून बाहेर आली तर दि. २२/०८/२०२३ रोजी ४ पिल्लाचा जन्म झाला. उर्वरित एक अंडे खराब झालेने लक्षात आले.

गोरेवाडा उदयानात कृत्रीम पद्धतीने अंडी उबवून पक्षी जन्माला येण्याची ही पहिलीच घटना आहे. या संपूर्ण अंडी उबवण्याची कामगिरी उदयानातील कर्मचारी अविनाश शेंडे, धीरज गोडबोले आणि सागर कटोते यांनी पार पाडली. या संपूर्ण प्रक्रियेसाठी उदयान संचालक, शतानिक भागवत, मुख्य अभिरक्षक, दिपक सावंत आणि पशुवैद्यक डॉ. मयुर पावशे यांनी मार्गदर्शन केले.

या औचित्यपूर्ण आणि महत्त्वाच्या यशाबद्दल वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक,विकास गुप्ता, आणि गोरेवाडा उदयानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखरन बाला यांनी याप्रसंगी सर्व चमूचे अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

क्या हकीकत में ED,CBI,CVC पारदर्शी एजेंसी हैं !

Fri Aug 25 , 2023
– अगर हो तो पिछले लोकसभा चुनाव में नागपुर जिले के उम्मीदवारों द्वारा किये गए नगद खर्च का लेखाजोखा संकलन,जाँच कर नियमानुसार कार्रवाई करें  नागपूर :- याद रहे कि प्रत्येक लोकसभा या अन्य सार्वजानिक चुनावों में उम्मीदवारों के चुनावी खर्च सीमा केंद्रीय चुनाव आयोग तय करती हैं लेकिन विडम्बना यह है कि कोई भी उम्मीदवार इसका पालन नहीं करता और […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com