संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी बळ समारोप समारंभाचे आयोजन शनिवार 23 मार्च 2024 रोजी कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस कॅम्पस दादासाहेब कुंभारे परिसरात करण्यात येत आहे.या कार्यक्रमाला धम्मसेनानी व महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते बळ पूज्य भन्तेजी आर्य नागार्जुन सुरई ससाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ड्रगन पॅलेसच्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे ह्या राहतील.
23 मार्च ला सकाळी साडे नऊ वाजता दादासाहेब कुंभारे परिसरात असलेल्या कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पास पूज्य भन्ते सुरई ससाई यांच्या शुभ हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल. हरदास विद्यालय ,दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या वतीने कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांना मानवंदना वाहण्यात येईल.याप्रसंगी दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्प स्थान ते विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल पर्यंत शांती मार्च चे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी साडे दहा वाजता पुज्यनिय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना घेण्यात येईल.
कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी समारोप समारंभ प्रसंगी धम्मसेनानी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रानेतेव,बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करिता संपूर्ण आयुष्य संमर्पित करणारे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व दादासाहेब कुंभारे यांचे निकटवर्तीय असलेले पुज्यनिय भन्ते सुरई ससाई यांना ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते चिवरदान व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
..कार्यक्रमाला पूज्य भन्ते नागदीपंकर थेरो,डॉ चिंचाल मेतानंद,पुज्यनिय भदंत प्रज्ञाज्योति,पुज्यनिय भदंत ज्योतिबोधी, पूज्यनिय भदंत नंदिता, पुज्यनिय भदंत रत्नदीपा, पुज्यनिय भदंत जयंता,पुज्यनिय भदंत सुगाता,पुज्यनिय भदंत ज्योतिका, पुज्यनिय भदंत नंदामित्र, पुज्यनिय भदंत रत्नप्रिय प्रामुख्याने उपस्थित राहतील तसेच पद्माश्री डॉ विकास महात्मे,माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे,प्रा कमला गवई,आंबेडकरी चळवळीचे विचारवंत विनायक जामगडे, साहित्यिक इ मो नारनवरे, समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक पूरणचंद्र मेश्राम,इत्यादी मान्यवरांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले आहे.