घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात जुनी कामठी पोलिसांना यशप्राप्त…

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

अटक आरोपिकडून चोरीस गेलेला 1 लक्ष 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी ता प्र 12 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राम मंदिर कडे जाणाऱ्या मार्गावरील भक्ती ट्रान्सपोर्ट समोर उभी असलेली दुचाकी 7 ऑगस्ट ला दिवसाढवळ्या सकाळी आठ वाजता चोरीस गेल्याची घटना घडली असता यासंदर्भात फिर्यादी यशवंतराव खुल्लरकर वय 61 वर्षे रा प्रगतीनगर रणाळा कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल करीत तपासाला गती देण्यात आली .या तपासाला तर्कशक्तीच्या आधारावर अवघ्या चार दिवसात आरोपीचा शोध लावण्यात जुनी कामठी पोलीस विभागाला यशप्राप्त झाले असून आरोपीचा शोध लावून आरोपीस अटक करण्यात आले.अटक आरोपीचे नाव शेख सोहेल उर्फ मोनू शेख वालीद वय 24 वर्षे रा पुराना भोईपुरा कामठी असे आहे .अटक आरोपीने जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत अजून एका ठिकाणी केलेली घरफोडी तसेच पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या घरफोडी ची कबुली दिली.यानुसार आरोपिकडून तीन चोरीच्या घटनेचा पर्दाफाश करण्यात आला.अटक आरोपी कडून तिन्ही घटनेतील चोरीस गेलेले 1 लक्ष 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक आरोपिकडून तिन्ही चोरी प्रकरणातील मुद्देमालात ऍक्टिवा दुचाकी क्र एम एच 49 पी 9629, किमती 35 हजार रुपये, चॉकलेटी रंगाची ज्युपिटर क्र एम एच 40 क्यू 7476 किमती 40 हजार रुपये, टिव्हीएस कंपनीची काळ्या रंगाची मोपेड क्र एम एच 31 डी पी 3853 तसेच सोन्या चांदीचे दागिने व नगदी 1 हजार रुपये असा एकूण 1 लक्ष 90 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही यशस्वी कारवाही डीसीपी सारंग आव्हाड, एसीपी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे , डी बी स्कॉड चे इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने, डी बी स्कॉड चे संजय गीते, महेश कठाने, रवी गावंडे,श्रीकांत भिष्णुरकर,अश्विन चहांदे, विवेक दोरसेटवार,अश्विन चहांदे यांनी केली .

Next Post

कामठी तहसील कार्यालयात सुरू झाल्या बाजारपेठ..

Fri Aug 12 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 12 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे अनुशंगाने ग्रामीण जीवोन्नती अभियान पंचायत समिती कामठी अंतर्गत आज 12 ऑगस्टला स्वयं.समुहांनी उत्पादित केलेल्या वस्तूची विक्री करण्यासाठी व उत्पादन,उत्पादक समूह यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे च्या मुख्य उद्देशाने कामठी तहसील कार्यालयात स्टॉल लावण्यात आले. या प्रदर्शनी व स्टॉल चे उदघाटन तहसीलदार अक्षय पोयाम व ,गट विकास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com