पवारसाहेबांनी फडणवीसांना याअगोदर ‘कात्रजचा घाट’ दाखवला होता आता ‘काशीचा घाट’ दाखवतील – नवाब मलिक

मुंबई दि. १७ जानेवारी – पवारसाहेबांवर बोलणार्‍या फडणवीसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर पवारसाहेब काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्हयाचा पक्ष बोलणार्‍या देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांनी जोरदार फटकारले आहे.

पवारसाहेब मुख्यमंत्री असताना फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले नाहीत. कालपर्यंत राज्यात २५-३० जागा निवडून येत होत्या ते पवारसाहेबांवर भाष्य करत आहेत. याअगोदरही पवारसाहेबांवर फडणवीस भाष्य करत होते त्यावेळी काय झाले याची आठवणही नवाब मलिक यांनी फडणवीस यांना करुन दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

स्टेशनरी घोटाळा सर्व विभागांच्या चौकशीसाठी समिती देणार पोलिस आयुक्तांना पत्र

Mon Jan 17 , 2022
-मनपा आयुक्तांना ही पोलिस आयुक्तांना पत्र देण्याचे निर्देश नागपूर, ता. १७ : मनपाच्या सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभागात झालेली आर्थिक अनियमितता व कार्यपद्धतीतील भ्रष्ट आचरणाची सदर पोलिस स्टेशन अंतर्गत चौकशी सुरु आहे. मात्र अशा प्रकारची अनियमितता आरोग्य विभागाव्यतिरिक्त अन्य विभागातही असू शकते. त्यामुळे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व विभागांतील व्यवहारांची चौकशी करण्याकरिता पोलिस आयुक्तांना पत्र द्यावे, असे निर्देश स्टेशनरी घोटाळा चौकशी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!