लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा – आर.आर. पाटील

11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी. शुक्ल यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांच्यावतीने दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवारला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय,गडचिरोली तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी दावे असे प्रलंबित वाद तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. यासाठी पक्षकार,अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोठया प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, 138 एन.आय.अॅक्ट प्रकरणे, भु-संपादन प्रकरणे,कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पंतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे. लोकन्यायालयात पारीत झालेल्या अवॉर्डची न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करता येते. लोकन्यायालयात तडजोड केल्याने लोकांचा वेळ, श्रम व पैसा यांची बचत होते. दोन्ही पक्षकारांमध्ये असलेले वैर संपुन गोडवा, चांगले संबंध निर्माण होतात.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई मार्फत संपुर्ण राज्यात 11 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे नियोजन केले आहे. तरी सर्वांनी दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी होणा-या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन सचिव आर.आर. पाटील यांनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नानकचंद रत्तू जयंतीनिमित्त अभिवादन

Wed Feb 8 , 2023
शांतीवन चिचोली येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन नागपूर :- परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वीय सहायक नानकचंद रत्तू यांच्या जयंतीनिमित्त ६ फेब्रुवारी २०२३ ला अभिवादन करण्यात आले. नानकचंद रत्तू यांच्या जयंतीच्या अनुषंगाने शांतीवन चिचोली येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात माजी मंत्री राजकुमार बडोले, भाजपा प्रदेश सचिव व प्रवक्ता ऍड. धर्मपाल मेश्राम, इंडियन बुद्धीस्ट कौंसिलचे कोषाध्यक्ष संजय पाटील, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com