आश्रमशाळेतील विद्यार्थी झाले बेशुद्ध ;१२० मुलं मुली एका टेंपो मध्ये कोंबून केला प्रवास..!

अमरदीप बडगे, प्रतिनिधी

एका मुलीला उचारासाठी गोंदियात हलविले

गोंदिया :- गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजितपूर येथील १२० आदिवासी मुलं मुली खेळण्यासाठी तिरोडा तालुका येथील कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी एकाच टेंपो मध्ये कोंबून नेण्यात आले. आणि परत हि त्याच टेंपो मध्ये कोंबून आणत असताना काही मुलं मुली टेंपो मध्येच बेशुद्ध झाले असता. त्यांना एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार साठी आण्यात आले असुन त्यांच्या वर उपचार सुरु असुन त्यातील एका मुलीला गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

 

या अगोदर जिल्हामध्ये आदिवासी मुलांना मारहाण प्रकरणामध्ये दोन शिक्षकांनी निलंबित केले होते.आता ही दुसरी घटना झाली आहे. ती देखील आदिवासी मुल बेशुद्ध झाल्याची आहे.यावर आता आदिवासी विभाग व प्रशासन कोणती कारवाई करेल याकडे लक्ष राहणार आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com