संदीप कांबळे, कामठी
एनएमआरडीए कार्यालयाची स्थापना लोकां च्या हितासाठी की त्रास देण्यासाठी.
कामठी ता प्र 23 : – जिल्ह्यातील ग्रामीण भागाची प्रगती व्हावी याकरिता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा ची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय नागपुरात आहे. याच कार्यालयात ग्रा मिण भागातील लोकांना भाग नकाशा, उपयोग प्रमाण पत्र मिळवण्यासाठी चकरा माराव्या लागतात. हा प्रका र ग्रामिण भागातील लोकांसाठी त्रासदायक आणि खर्चिक आहे. या स्थितीत तातडीने ग्रामिण भागातील प्लॉट, शेतीची खरेदी विक्री करणाऱ्याना निबंधक कार्यालयातच भाग नकाशा किंवा उपयोग प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपात मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी केली आहे.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सभापती मनोज सूर्यवंशी यांना उद्देशुन लिहिलेल्या पत्रातून त्यांनी या गंभीर मुद्याकडे लक्ष वेधले आहे. जिल्हयातील तालुका पातळीवर उपनिबंधकांचे/रजि स्टारचे कार्यालय आहे. तेथूनच प्लाट, शेती खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. पण जेव्हापासून एनएमआर डीएच्या कवेत ग्रामीण भाग देण्यात आला, तेव्हा पासु ग्रामिण नागरिकांना खरेदी विक्री करण्यापूर्वी भाग नकाशा, उपयोग प्रमाणपत्र नागपुरातील एनएमआरडी ए कार्यालयातून प्राप्त करावे लागते. या करिता अर्ज केल्यानंतर तातडीने भाग नकाशा मिळत नाही. या करिता दोन ते चार दिवस लागतात. अनेकदा आठ दिवसां पेक्षा ही जास्त काळ लागु शकतो. शिवाय एन एमआरडीएच्या कार्यालयात अनेक दलाल सक्रिय झाले आहेत. ते मग शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांना तातडीने प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आमिष दाखवता त. यात अनेक शेतकऱ्यांची विनाकारण फसगत झाले ली आहे. ही सर्व स्थिती पाहता एनएमआरडीए कार्या लयाची स्थापना लोकांच्या हितासाठी झाली की त्यांना त्रास देण्यासाठी हाच प्रश्न उदभवला असल्याने यावर उपाय उपलब्ध आहेत. ज्या कार्यालयातून प्लॉट, शेती ची खरेदी विक्री होणार आहे. तेथेच एनएमआरडीए कडून ऑनलाईन आपला रेकॉर्ड उपलब्ध करून द्यावा . यामुळे शेतकऱ्यांना वारंवार चकरा मारण्याची गरज भासणार नाही. शिवाय उदयास आलेली दलाल संस्कृ तीलाही मुठमाती मिळेल. अशी न्यायीक मागणीचे निवेदन देताना माजी खासदार प्रकाश जाधव, प्रविण जुमडे, राजा रामेव्दार, मोतीराम रहाटे, विलास भोंबले, राजेश तुमसरे, कोटीराम चकोले , सुनिल सरोदे, कमल यादव, अभिमन्यु चावला, राजु बारई, वरघने, सतीश, प्रा.जिवतोडे, प्रकाश काकडे, अशोक मेश्राम आदी उपस्थित होते.
जेथे खरेदी-विक्री तेथेच रेकॉड उपलब़्ध व्हावा – माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव
ग्रामिण भागातील लोकांना भाग नकाशा, उपयोग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चकरा माराव्या लागतात. हा प्रकार ग्रामिण भागातील लोकांसाठी त्रासदायक आणि खर्चिक आहे. या स्थितीत तातडीने ग्रामिण भा गातील प्लॉट, शेतीची खरेदी विक्री करणाऱ्या निबंधक कार्यालयातच भाग नकाशा व उपयोग प्रमाणपत्र ऑन लाईन स्वरूपात मिळण्याची व्यवस्था करायला हवी. शिवाय एनएमआरडीए कार्यालयाची स्थापना करते वेळी शेतकऱ्यांचे मत एकुण घेतले काय ?
.