नागपूरमध्ये किल्ले चंद्रपुरची हुबेहूब प्रतिकृती साकारली

नागपूर :- शिवछत्र प्रतिष्ठान निर्मित काल्पनिक किल्ला प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात चंद्रपुरातील गोंडकालीन किल्ला, महाकाली मंदिर, राणी हिराइ आणि राजे बिरशाह यांची समाधी आणि सर्व ऐतिहासिक परिसर हुबेहूब आणि वस्तुनिष्ठ साकारला आहे. तेजस आकर्ते हे मुख्य कलाकार असून, तेजस कोडापे, शिव कायरवार, कान्हा वासनकर व समूहाच्या पुढाकाराने नागपूर येथील तुकडोजी चौक येथे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनात किल्ले चंद्रपुरचे प्रवेशद्वार, बुरुज, दरवाजे, महाकाली मंदिरातील मूर्ती, राणी हिराई आणि राजे बिरशाह यांची समाधी या सर्व गोष्टी हुबेहूब साकारल्या आहेत. या प्रदर्शनामुळे चंद्रपुरातील ऐतिहासिक वारसा जतन होण्यास मदत होईल. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन या कामाचं कौतुक केलं आहे.

या प्रदर्शनाबाबत तेजस आकर्ते म्हणाले, “चंद्रपुर हा गोंडकालीन इतिहासाचा एक महत्त्वाचा वारसा आहे. या वारशाला जतन करण्यासाठी आम्ही हे प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनामुळे चंद्रपुरच्या ऐतिहासिक वारसाबद्दल जागरूकता निर्माण होईल, अशी आशा आहे.. दरम्यान, राजे मुधोजी भोसले यांनी किल्ले चंद्रपुरला सदिच्छा भेट देऊन पुजन केल. व उपस्थित शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या.

NewsToday24x7

Next Post

स्व. बाबुराव वंजारी समाजाच्या विकासासाठी झटले – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Sun Nov 19 , 2023
नागपूर :- स्व. बाबुराव वंजारी यांनी समाजाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या मनमिळावू वृत्तीमुळे ते सर्वच पक्षांमध्ये आणि सर्व विचारांच्या संघटनांमध्ये लोकप्रिय होते, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्व. बाबुराव वंजारी यांना श्रद्धांजली अर्पण केली. नागपूर जिल्हा तेली समाज सभेच्या वतीने सोमवारी क्वार्टर येथील संताजी सभागृहात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार कृष्णा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com