मुंबई – उद्धवजी जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते, त्या दरम्यानचे माझे व्हिडीओ पुन्हा एकवार बघा, मी जे काय उद्धव ठाकरे यांच्या एकंदर राजकीय जीवनाविषयी वृत्ती आणि वागण्याविषयी बोललो होतो, आज या दिवसात पुन्हा एकवार माझेच सांगणे कसे खरे ठरते कसे ठरे ठरले, तुमच्या ते नक्की लक्षात येईल. उद्धव ठाकरे कधीही केव्हाही कोणालाही जबर्या खुनशी राजकीय महत्वाकांक्षेमुळे क्षणार्धात संपवून, बाजूला सारून, एकटे पाडून, धोका देऊन, महत्व संपवून,प्रसंगी उध्वस्त करून मोकळे होतात हे जे मी सतत आजतागायत त्यांच्याविषयी अगदी जाहीर कायम सांगत बोलत लिहीत आलेलो आहे त्यांच्या या वृत्तीचे त्यांनी पुन्हा एकवार अगदी उघड आणि जाहीर प्रदर्शन करून ते मोकळे झाले आहेत. जसा कृष्ण जन्माला आला आणि सतत लागोपाठ अन्याय अत्याचार करणाऱ्या कंसाचा थेट वध करून मोकळा झाला, येथे मी शंभर टक्के उद्धव ठाकरे यांना कंसमामा ठरवणार नाही पण उद्धव यांच्या वारंवार त्याच त्या चुका आणि त्याच त्या चुकांतून त्यांनी सतत अनेकांना कित्येकांना राजकारणातून राजकीय जीवनातून उध्वस्त करणे किंवा तसा जबरी प्रयत्न करणे ते तसे घडवून आणणे, एक दिवस असा उजाडेल कि उद्धव यांना पुरून उरणारा नक्की कोणीतरी पुढे येईल, आणि उद्धव यांचे आजवरचे राजकीय कुकर्म त्याला नक्की छेद देऊन, कोणीतरी एक दिवस आपलाही बाप रस्त्यात आड येत असतो, हा वाक्प्रचार सत्यात उतरवेल…
तो नेमका कोण असेल म्हणजे एकनाथ शिंदे कि देवेंद्र फडणवीस कि त्यांच्याच दोन मुलांपैकी कोणी एक कि वेगळा कोणीतरी, हे आज या ठिकाणी मला नक्की सांगता येणार नाही पण त्या मुलीने जसे कंसाला सांगितले होते कि आठवा जन्माला येणार आहे जो तुझा वध करून मोकळा होणार आहे त्याचपद्धतीने मी थेट अगदी जाहीर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना सांगतो आहे कि आत्तातरी पूर्वीचे सध्याचे वागणे, बदला घेऊन एखाद्याला संपविण्याचे राजकारण हि वृत्ती तुम्ही सोडून द्या आणि सरळमार्गाने सन्मानाने लोकांना नेत्यांना मतदारांना सामोरे जा, विशेषतः त्यातून तुमच्या वडिलांची पुण्याई तुम्हाला नक्की तरुन नेईल आणि तुम्हाला, तुमच्या उरल्यासुरल्या शिवसनेतला तुमच्या नेतृत्वाला तुमच्या कुटुंबाला नक्की त्यातून राजकीय सुगीचे दिवस येतील. प्रसंगी जीवाला जीव देणार्या नातेवाईकांना तुम्ही डावलले नजरेआड केले मातोश्रीवरून घालविले, बाळासाहेबांपासून तोडले, मला कधी कधी माझ्या जिभेवर तीळ असल्याची भीती वाटते म्हणून मी तोंडातून ते वाक्य बाहेर काढायला घाबरतो कि तुमच्याच हयातीत आदित्य आणि तेजस ठाकरे त्यांच्यातील राक्षसी राजकीय महत्वाकांक्षा जागृत होऊन त्यांच्यातल्या एखाद्याचा राज ठाकरे होता कामा नये…
आणि आता एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो ज्याची मला भीती वाटत होती पण शेवटी ते एकदाचे घडले आहे आणि उद्धव हे त्यांच्या मूळ स्वभावाला जागून त्यांनी यावेळी तर थेट शरद पवारांना म्हणजे जे पवार ज्याला त्याला रस्त्यात येणाऱ्या कोणालाही जबरी जबरदस्त राजकीय महत्वाकांक्षेतून बाजूला सारून एकटे पाडून महत्व संपवून मोकळे व्हायचे त्याच पवारांना उद्धव ठाकरे यांनी अलगद बाजूला सारून निदान सध्या तरी एकटे पाडून धोका देऊन अंधारात ठेवून त्या उद्धव ठाकरे यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांच्या पक्षाशी युती केली आहे, आणि उद्धव यांच्याच म्हणे सांगण्यावरून प्रकाश आंबेडकर उद्धव यांच्या सध्याच्या आघाडीची चिंता पर्वा काळजी न करता थेट शरद पवार यांच्यावर जहरी शाब्दिक बाण सोडून मोकळे होताहेत. थोडक्यात उद्धव आणि आंबेडकर या दोघांनी आपली युती जाहीर करून एकाचवेळी उद्धव व आंबेडकर दोघांनी गळ्यात गळा घालून थोडक्यात उद्धव यांनी त्यांच्या प्रेमाचे गोडवे गाणार्या राज्यातल्या काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला म्हणाल तर उद्धव यांनी धोका दिला आहे, तोंडावर पडले आहे थोडक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला राजकीय अडचणीत फेकले आहे, एक मात्र नक्की कि उद्धव असे काही करतील याची पुसटशीही कल्पना बेरकी शरद पवार यांना जरी अजिबात आली नव्हती तरी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांच्या उद्धव नि प्रकाश आंबडेकर या दोघातील राजकीय गुफतगू कानावर पडले होते त्यातून त्यांनी पुढल्या निवडणुका आम्ही एकट्याने लढू असे जाहीर केले होते, मात्र तसे काहीही होणार नाही, येणाऱ्या राज्यातल्या प्रत्येक महत्वाच्या निवडणुका यापुढे राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन लढतील अशी माझी माहिती आहे, त्यादृष्टीने त्यांच्या नेत्यांची वरिष्ठ ज्येष्ठ पातळीवर बोलणी सुरु आहे. मिस्टर प्रकाश आंबेडकर जे उद्धव ठाकरे त्या भाजपाचे किंवा थेट शरद पवार यांचे झाले नाहीत, जे उद्धव घरातल्यांचे आणि जीवाला जीव देणार्या त्यांच्या पक्षाच्या, शिवसेनेतल्या असंख्य नेत्यांचे कधी झाले नाहीत, पुढला नंबर तुमचा, एवढे सांगून हे लिखाण येथेच पूर्ण करतो….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी