संदीप कांबळे,कामठी
-अप्रोच रस्ता बांधकाम लवकरात लवकर न केल्यास अतुल बाळबुधे ने दिला आंदोलनाचा ईशारा
कामठी ता प्र 25:-कामठी तालुक्यातील पळसाड केम रोड वरील नाग नदी च्या पुलाचे बांधकाम सार्वजनिक विभागाच्या वतीने कंत्राटी स्वरूपात दिलेल्या बांधकामातून मागील 4 वर्षापूर्वी बांधकाम पूर्ण झाले.परंतु पडसाड व केम गावाकडील जाणारा अप्रोच रस्ता बांधकाम आजूनपावेतो करण्यात आले नाही परिणामी या अप्रोच रस्ता बांधकामाअभावी या अप्रोच रस्त्याने मार्गक्रमन करणाऱ्या शालेय विद्यार्थी व नागरिकांना नाहक मोठा त्रास भोगावा लागत असून दररोज किरकोळ अपघाताला बळी पडावे लागत आहे.वास्तविकता या मार्गाने वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे जीव धोक्यात आहे याची जाणीव घेत केम ग्रा प चे उपसरपंच अतुल बाळबुद्धे नागरिकासंमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत केम तर्फे सामूहिक निवेदनही देण्यात आले. इतकेच नव्हे तर संबंधित अधिकाऱ्यांना सदर अप्रोच रोड वर परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली दाखवण्यात आली . दरम्यान बांधकाम करण्याचे आश्वासित करून आश्वासनाची खैरात देण्यात आली मात्र संबंधित कंत्राटदाराला बांधकाम करण्याचे आदेशीत केले नसल्याने सदर अप्रोच रस्त्यावर दुचाकीवरून पडणे, किरकोळ अपघात होणे हे नित्याचेच झाले आहे.तेव्हा या रस्त्यावर कुण्या शालेय विद्यार्थ्यांचा वा कुणा नागरिकांचा अपघाती बळी जाईल तेव्हा अप्रोच बांधकाम करण्यास सुरुवात होईल का?अशी विचारणा करीत सदर अप्रोच रस्ता बांधकाम लवकरात लवकर सुरू न केल्यास संबंधित सार्वजनिक विभागातील अधिकारी व संबंधित कंत्राटदाराविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा ईशारा केम ग्रा प चे उपसरपंच अतुल बाळबुधे यांनी जी प सदस्य प्रा अवंतिका ताई लेकुरवाडे यांना दिलेल्या सामूहिक निवेदनातून दिला आहे.
हे निवेदन केम ग्रामपंचायत चे उपसरपंच अतुल बाळबुधे यांच्यासह गावातील नागरिक गोविंदराव भोयर, देवराव कुथे, कोटीराम महल्ले,नरेश जिभाकाटे,चंदू आकरे,नरेश महाले,एकनाथ साबळे, नामदेव देऊळकर, सुधाकर चौधरी,कैलास नरड, गुणवंत फुलझेंले, जितेंद्र पंचबुधे, चुळामन ढोबळे, सुधाकर शेंडे, रुपेश अतकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
-सदर बांधकामाचे कंत्राट कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे माजी मंत्रीच्या भावाला असल्याने सदर कंत्राटदार कुणालाही जुमानत नाही’.’मेरी मर्जी’या भूमिकेतून एकाधिकारशाही गाजविण्याचे काम सुरू असून सदर कंत्राटदाराला सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभय दिसून येते.मात्र या प्रकारच्या अरेरावी पणा मुळे कुणाचा अपघाती मृत्यू होत असेल तर त्या संबंधित सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यासह सदर शेफाळल्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी अतुल बाळबुधे यांनी केली आहे.तर कांग्रेसचे अतुल बाळबुधे हे सत्ताधारी महाविकास आघाडीचे प्रतिनिधी असून सदर जी प सर्कल चे नेत्या जी प सदस्य कांग्रेस चे आहेत तरीसुद्धा न्यायिक हक्काच्या मागणीसाठी नागरी हितार्थ वणवण भटकंती करावी लागते तरीही कुणी ऐकिना अशी अवस्था असल्याने महाविकास आघाडीचे प्रतिनिधी असल्याचे शोकांतिकाच म्हणावी लागेल…