जिवानिशी ठार मारणाऱ्या पाहीजे आरोपींना अटक

नागपूर :- दिनांक १६.०८,२०२३ चे २१.०० वा. ते २१.३० वा. चे दरम्यान फिर्यादी रवि बच्चन जैस्वाल वय २५ वर्ष ग. वार्ड नं. ०३, उमरेच्या दवाखान्याजवळ, हिंगणा रोड, राजीव नगर, नागपुर व राकेश चंद्रकांत मिश्रा वय ३२ वर्ष ग.राजीव नगर, हे पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हट्टीत, राजकुमार जैसवार याचे राम पान पॅलेस राजीव नगर, येथे बसुन होते. राकेश मिश्रा याचे आरोपीचे वडीलासोबत २ ते ३ महीण्या अगोदर झालेले जुन्या भांडणाचे कारणावरून आरोपी अर्जुन रामा दांडेकर व त्याचे ०४ से ५ साथीदार यांनी गैर कायदयाची मंडळी जमवुन फिर्यादी व फिर्यादीचा साथीदार यांना जिवानीशी ठार मारण्याचे उद्देश्याने धारदार चाकु, व तलवारी सारख्या शस्त्राने गंभीर जखमी केले. जखमी राकेश मिश्रा यांना उपचारकामी पडोळे हॉस्पीटल येथे नेले तेथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले व जखमी फिर्यादीचा लता मंगेशकर हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पो. ठाणे एम.आय.डी.सी. येथे आरोपीविरुद्ध कलम ३०२, ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, भादवि सहकलम ४, २५. भा. . का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासात गुन्हेशाखा युनिट क ०१ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहीतीवरून व सायबर गुन्हे शाखा यांचेकडून वेळोवेळी लोकेशन घेउन आरोपींचा शोध घेवून आरोपी क्र. २) गणेश उर्फ रामा दांडेकर, वय २६ वर्ष, रा. राजीव नगर वार्ड नं ५ एमआयडीसी, नागपूर, २) राहुल उर्फ सिनू संजय शिंदे, वय २३ वर्ष, रा. विदर्भ सोमा, संजय किराणा स्टोअर्स समोर, पो.ठाणे. अवधूत वाडी, यवतमाळ ३) देवांश अजय शर्मा, वय २३ वर्ष, गणपती मंदीर जवळ, माळीपुरा,  यवतमाळ सिटी, यवतमाळ ४) हसन खान उर्फ गब्बर अन्वर खान, वय २० वर्ष, रा. इंद्रनगर, शारदा चौक, पो.ठाणे. अवधूत वाडी, यवतमाळ ५) वेदांत संतोष मानकर, वय १९ वर्ष, रा. अंबिकानगर, सेजल रेसिडंसी कॉलोनी, पो.ठाणे. यवतमाळ सिटी, यवतमाळ यांना पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेतले.. आरोपी क ०६) अमीर उर्फ अमीरा मुस्तफा शहा, वय १८ वर्ष, रा. राजीव नगर, वार्ड नं. ५. हिंगणा रोड, नागपुर यांस एम.आय.डी.सी येथून ताब्यात घेतले आरोपिंना गुन्हयाबाबत विचारले असता त्यांनी सर्वांनी मिळून गुन्हा केल्याचे सांगीतले. आरोपीकडुन वेगवेगळया कंपनीचे २५ मोबाईल एकुण अ. कि १,५७,०००/- व गुन्हयात वापरलेली वटा कंपनीची टियागो फोर व्हिलर गाडी क्र.एम.एच.०२ ई.के.४९३९ कि. अं.५,००,०००/- असा एकुण ६,१७,०००/- मुझेमाल जप्त करून आरोपींची वैद्यकिय तपासणी करून पुढील कारवाई करीता एम. आय. डी. सी. पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.

वरिल कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सपोआ (डिटेक्शन), त्यांचे मार्गदर्शनाखाली पोनि सुहास चौधरी, सपोनि राजेन्द्र गुप्ता, पोहवा वचन राउत, विनोद देशमुख, नितीन बासनीक, नुतनसिंग छाडी, सुमीत गुजर, नापोअ, मनोज टेकाम, सुशांत सोळंके, रितेश तुमडाम, मनोज टेकाम, हेमंत लोणारे, योगेश वासनीक, अजय शुक्ला, सोनू भावरे, पोअ रवि राउत, शिवशंकर रोठे, रविन्द्र खेडेकर, चंद्रशेखर भारती, नितीन यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मा. न्यायालयातुन आरोपीला शिक्षा 

Tue Aug 22 , 2023
नागपूर :- दिनांक २१.०८.२०२३ रोजी मा. अति. जिल्हा न्यायधिश व अति सत्र न्यायधिश विशेष पोक्सो कोर्ट ओ.पी. जयस्वाल, नागपूर यांनी त्यांचे कोर्टाचे केस क्र. २९६/२०२२ मधील पो. ठाणे कळमणा येथील अप. क. २०४/२०२२ कलम ३५४, ३५४(८) ३४२ ३८४, ३२३, ५०४, ५०६ भा.द.वी. सहकलम ८ पोक्सो या गुन्हयातील आरोपी आशिष हेमराज घरडे, वय १९ वर्ष, रा. भांडेवाडी, नागपुर याचे विरुद्ध साक्षी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com