वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई :- वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे.

ग्रंथालय संचालनालयांतर्गत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबईच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमाअंतर्गत समूह वाचन, ग्रंथप्रदर्शन, वाचन कौशल्य कार्यशाळा, ग्रंथपरिक्षण व कथन, व्यवसाय मार्गदर्शन, वाचन कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या प्रसंगी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, ग्रंथालय उपसंचालक श्री.काकड, यंग लेडीज हायस्कूलच्या शिक्षिका उषा वर्मा, सुजाता महाजन, वर्षा शिंदे यांच्यासह विद्यार्थीनी, इतर वाचक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ग्रंथपाल शालिनी इंगोले यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी वाचन कार्यशाळेचे उद्घाटन करून वाचनाचे महत्व सांगून कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.

कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्रा. शामकुमार पां. देशमुख, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर यांनी मार्गदर्शन केले. वाचन म्हणजे काय, त्याचे फायदे, काय वाचावे? वाचण्याच्या विविध पद्धतीचे सविस्तर विवेचन केले. वाचनाने मनाची ताकद, आकलन क्षमता, वैचारीक पातळी वाढते. वाचनाचे मुलभूत अंग या प्रसंगी विशद करण्यात आले. वाचनाचे चार स्तर असून प्रत्येक स्तरावर आपल्या वैचारीक पातळीत बदल होतो. वाचनाची सवय लावण्यासाठी दररोज आवडीच्या विषयावर किमान 20 मिनिटे वाचन करण्याचे स्वत:ला बंधन घातले पाहिजे असेही त्यांनी उपस्थित वाचक आणि विद्यार्थ्यांना सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन योगेश बिर्जे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधांचा विकास करावा - पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

Tue Jan 7 , 2025
मुंबई :- राज्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास व पर्यटन उपक्रमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी त्याच बरोबर आगामी शंभर दिवसात राबविण्यात येणा-या उपक्रमांवर भर द्यावा असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज मंत्रालयात झाली. यावेळी पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ बी एन पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!