यवतमाळ :- कोष्टी समाज बहुउद्देशीय संस्था, यवतमाळच्या वतीने वधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता अवधूतवाडी येथील उत्सव मंगल कार्यालयात होणार आहे.
या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील इच्छुक वधू-वरांना आपले जीवनसाथी निवडण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळणार आहे. मेळाव्याकरिता नोंदणी प्रारंभ झाली आहे. नोंदणी करण्याकरिता अनिल भड ९५०३७५८४९६, ९६३७९०७२२० या क्रमांकावर संपर्क करावा व समाजातील इच्छुकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र खोडवे, उपाध्यक्ष अरुण खाटले, व सचिव गिरीश झंझाड,प्रवीण डाळ, नंदकिशोर बोरकर, विनोद खोडकूंभे, प्रभाकर अलोने, राजेंद्र जुमळे, विजय भंडारे, राजेंद्र भुजबळ, संजय तिडके, रवींद्र बोरीकर, दुर्गेश खोडकुंभे, संदीप गजकल, नारायण उकंडे, विनायक निवल, डॉ सुषमा खोडवे यांनी केले आहे.
या उपक्रमाची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे क्रांती अलोने यांनी दिली आहे.