Ø ग्रंथ प्रदर्शन व विक्री
Ø विविध सांस्कृतिक कार्यक्रम
यवतमाळ :- ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने ए.पी.जे.अब्दुल कलाम अभ्यासिका, दारव्हा रोड यवतमाळ येथे दोन दिवशीय ‘यवतमाळ ग्रंथोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन गुरुवार दि.20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते होणार आहे.
पहिल्या दिवशी दि.20 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वाजता ग्रंथ दिंडी निघेल. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, ज्येष्ठ साहित्यिक डॅा.रमाकांत कोलते, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॅा.जयश्री राऊत, सहाय्यक ग्रंथालय संचालक डॅा.राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मनोज रणखांब उपस्थित राहणार आहे.
उद्घाटन सकाळी 11 वाजता पालकमंत्र्यांच्याहस्ते होईल. यावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा.डॅा.अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खा.संजय देशमुख, खा.प्रतिभा धानोरकर, खा.नागेश पाटील आष्टीकर, आ.भावना गवळी, आ.किरण सरनाईक आ.धिरज लिंगाडे, आ.राजु तोडसाम, आ.बाळासाहेब मांगुळकर, आ.संजय देरकर, आ.किसन वानखेडे, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक कुमार चिंता उपस्थित राहणार आहे.
दुपारी 3 वाजता नायब तहसिलदार रुपाली बेहरे या ‘अहिल्या’ हा एकपात्री प्रयोग सादर करतील. परतवाडा येथील अपुर्वा सोनार व वेणीकोठी येथील विद्यार्थीनी ऋतिका गाडगे या ‘मी सावित्रीबाई बोलते’ हा एकपात्री प्रयोग सादर करतील. त्यानंतर सावित्रीबाई समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी पथनाट्य सादर करतील.
दुसऱ्या दिवशी दि.21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता वरिष्ठ महाविद्यालयीन युवकांसाठी ग्रंथ समिक्षा आणि सादरीकरण स्पर्धा होईल. अध्यक्षस्थानी विनोद देशपांडे तर परिक्षक म्हणून प्रा.कल्पना राऊत, प्रा.सत्यवान देठे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजता मराठी अभिजात झाली? व्यावहारीक अभिजाततेचे काय? या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रा.वसंत पुरके तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब धांदे, विनोद देशपांडे उपस्थित राहणार आहे. परिसंवादाचे वक्ते म्हणून प्रा.आशिष कांबळे, प्रा.अंकुश वाकडे, स्नेहा टोम्पे, प्रतिक्षा गुरनुले उपस्थित राहतील.
सायंकाळी 4 वाजता ग्रंथोत्सवाचा समारोप होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॅा.रमाकांत कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, बाळासाहेब धांदे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, शिक्षण विस्तार अधिकारी स्मिता घावडे उपस्थित राहणार आहे. ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकांचे पुस्तक विक्री व प्रदर्शनी दालने राहणार आहे. या महोत्सावाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन यांनी केले आहे.