संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील माहे जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंतच्या कालावधीपर्यंत मुदत संपत असलेल्या 11 ग्रामपंचायतीसाठी प्रभाग रचना व जागेचा आरक्षण कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यानुसार आज 3 फेब्रुवारीला कामठी तहसील कार्यालय सभागृहात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनार्थ नायब तहसीलदार राजीव बमनोटे यांच्या मुख्य उपस्थितीत नियुक्त प्राधिकृत अधिकारी,संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व तलाठी यांची विशेष सभा आयोजित करून प्रभागाचे सीमांकन व जागेचे आरक्षण संदर्भात विशेष मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात आले.तर 7 फेब्रुवारीला संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी गावाची संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे व सीमा निश्चित करण्याचे आदेशीत केले.
ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकिसाठी जाहीर प्रभाग रचना कार्यक्रम नुसार 15 फेब्रुवारीला तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने प्रभाग रचनेची तपासणी करणे,सदर समितीमध्ये गटविकास अधिकारी व संबंधित मंडळ अधिकारी चा समावेश राहील.21 फेब्रुवारीला सदर समितीने प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी सादर करायचे आहे.3मार्च ला जिल्हाधिकारी यांनी नमुना ब (प्रारूप प्रभाग रचना)ची संक्षिप्त तपासणी करावे व त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या करणे व मान्यता देणे,14 मार्च ला तहसीलदाराने प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता द्यावी .या जाहीर प्रारूप प्रभाग रचनेवर 17 मार्च 2023 पर्यंत हरकती व सूचना मागविणसाठी जाहिर सुचना प्रसिद्ध करणे ,24 मार्च पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सादर करणे,28 मार्च ला सर्व हरकती व सूचना सुनावणी साठी उपविभागीय अधिकारी कडे सादर करणे,सहा एप्रिल ला प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील.11 एप्रिलला सुनावणी अहवाल अभिप्राय नोंदवून जिल्हाधिकारीकडे सादर करतील 17 एप्रिल ला जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगास सादर करतील.तर 25 एप्रिल ला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रभाग रचना व जागेचे आरक्षण करण्यासाठी सण 2011 च्या जनगणनेची आकडेवारी विचारात घेण्यात आली आहे त्यानुसार आगामी 11 ग्रामपंचायतची लोकसंख्या 23 हजार 884 इतकी ग्राह्य धरली जात आहे. आगामी सार्वत्रिक निवडणूक होनाऱ्या या 11 ग्रा प मध्ये वरंभा, बिडगाव, नेरी, गारला, नान्हा मांगली, वारेगाव उमरी, कवठा, चिकना, बाबूलखेडा , चिखली चा समावेश आहे.